श्री नाईकबा यात्रेची नियोजन मीटिंग आज संपन्न..

प्रतिनिधी- सागर पाटील
श्री नाईकबा देवाची यात्रा सुरळीत पार पाडावी यासाठी सर्वांनी एकत्र येऊन काम करावे :पाटणचे तहसीलदार रमेश पाटील यांच्या सर्व विभागाला सूचना
सातारा(सागर पाटील)लाखो लोकांचे श्रद्धास्थान असलेले नाईकबा देवाची यात्रा एक मोठी असून ती सुरळीत पार पाडण्यासाठी प्रत्येक विभागाने जबाबदारीने काम करण्यात यावे दिनांक 26 मार्च पर्यंत सूचनेप्रमाणे सर्व कामे झाली पाहिजेत मोठ्या संख्येने येणाऱ्या भाविकांना योग्य सुविधा मिळाव्यात तसेच अटी व नियमांचे सर्वांनी पालन केले तर कोणत्याही प्रकारचा अडथळा येत नाही अशा सूचना पाटणचे तहसीलदार रमेश पाटील यांनी दिल्या. बनपुरी तालुका पाटण येथील नाईकबा देवाची यात्रा 26 व 27 मार्च रोजी होत आहे या संबंधी नियोजनाची बैठक नाईकबा देवस्थान या ठिकाणी झाली त्यावेळी ते बोलत होते. यावेळी नायब तहसीलदार प्रशांत थोरात, उपविभागीय पोलीस अधिकारी विवेक लावंड, गटविकास अधिकारी गोरख शेलार ,ढेबेवाडी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिजीत चौधरी, ढेबेवाडी विभागाचे मंडळ अधिकारी प्रवीण शिंदे, बनपुरी ग्रामपंचायतचे सरपंच मनोज पाटील ,यात्रा कमिटीचे नाईकबा देवस्थानचे ट्रस्टचे अध्यक्ष विलास जानुगडे. यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिजीत चौधरी म्हणाले यात्रा उत्तम व सुरळीत पार पाडावी तसेच यात्रेमध्ये कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सर्वांनी खबरदारी घेऊन एकत्र काम करावे, तसेच यात्रेसाठी ज्यादा पोलीस बंदोबस्त मागविण्यात आला आहे असे चौधरी म्हणाले. बनपुरी गावचे सरपंच मनोज पाटील म्हणाले बनपुरी ग्रामपंचायत तिने विविध जिल्ह्यातून येणाऱ्या भाविक भक्तांच्या गाड्यांच्या साठी पार्किंगची सोय केली आहे शिवाय पिण्याच्या पाण्याची सोय केली आहे तसेच गावातील 70 स्वयंसेवकांची टीम तयार करण्यात आली आहे असे सांगितले.यावेळी कार्यकारी अभियंता उप प्रादेशिक, परिवहन अधिकारी, प्रशासन सार्वजनिक बांधकाम विभाग, तालुका आरोग्य अधिकारी ,आगार व्यवस्थापक ,विद्युत वितरण कंपनी, प्राथमिक आरोग्य केंद्र ढेबेवाडी,श्री नाईकबा देवस्थान ट्रस्ट सदस्य,पोलीस पाटील ,ग्रामस्थ व हेल्पिंग नेचर विक्रमा या यूट्यूब चैनल चे संस्थापक माननीय श्री विक्रम पाटील.या बैठकीला उपस्थित होते .प्रास्ताविक व स्वागत नाईकबा देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष विलासराव जानुगडे यांनी केले.



