आर्थिकपूणेमहाराष्ट्रमूंबईविशेषशहरसामाजिक

आज ०१ सप्टेंबर पासून मुंबई पुण्यात रिक्षा टॅक्सी भाडेवाढ..

प्रतिनिधी सतिश पाटील मुंबई दि. ०१ सप्टेंबर २०२६ मुंबई महानगर व पुणे क्षेत्रात १ सप्टेंबर २०२६ पासून रिक्षा आणि टॅक्सीच्या किमान भाड्यात अनुक्रमे १ रुपया आणि २ रुपयांची वाढ लागू झाली आहे. नवे भाडेदर (मुंबई आणि परिसर) ऑटो-रिक्षा: पहिल्या १.५ किलोमीटरसाठी किमान भाडे २७ रुपये (जुने भाडे २६ रुपये) झाले असूनपुढील प्रति किलोमीटर दर १८.२२ रुपये (जुना दर १७.१४ रुपये) करण्यात आला आहे. काळी-पिवळी टॅक्सी: पहिल्या १.५ किलोमीटरसाठी किमान भाडे ३३ रुपये (जुने भाडे ३१ रुपये) झाले असूनपुढील प्रति किलोमीटर दर २१.९० रुपये (जुना दर २०.६६ रुपये) करण्यात आला आहे. महत्त्वाची माहिती क्षेत्र: हा निर्णय मुंबई, ठाणे, नवी मुंबई, कल्याण, वसई, विरार आणि पालघरसह संपूर्ण एमएमआर (MMR) क्षेत्रात लागू आहे.
मीटर कॅलिब्रेशन: वाहन चालकांना इलेक्ट्रॉनिक मीटर रिक्षा-टॅक्सी युनियन व आरटीओच्या नियमांनुसार बदलण्यासाठी ३० नोव्हेंबर २०२६ पर्यंतची मुदत दिली आहे. अशी माहीती सुत्राकडून मिळाली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!