महाराष्ट्रमूंबईविशेषसामाजिक

आता रेल्वे मालवाहतूक ही होणार खाजगी…

प्रतिनिधी सतिश पाटील मुंबई दि. ०२ सप्टेंबर २०२६ मुंबई महानगर प्रदेशातील मालवाहतुकीचा चेहरामोहरा बदलण्याच्या दिशेने रेल्वेने मोठे पाऊल टाकले आहे. मुलुंड, उरण, कळंबोली आणि तुर्भे येथील रेल्वेच्या जमिनीवर मालवाहतुकीशी संबंधित सुविधा विकसित करण्यात येणार आहेत. विशेष म्हणजे या सुविधा खासगी विकासकांच्या गुंतवणुकीतून उभारल्या जाणार आहेत. जमीन रेल्वेच्याच मालकीची राहणार असून विकासकाला ती दीर्घ मुदतीसाठी वापरण्यास दिली जाणार आहे.

रेल्वे मंत्रालयाच्या २०२६च्या सुधारित धोरणानुसार रेल्वेच्या अतिरिक्त जमिनीवर मालवाहतूक व रसदविषयक सुविधा उभारण्यासाठी २५ वर्षांपर्यंतचा भाडेपट्टा देता येणार असून, तो ५० वर्षांपर्यंत वाढविता येतो. स्पर्धात्मक निविदेतून खासगी सहभाग घेऊन या सुविधा विकसित करता येणार आहेत. आणखी काय काय खाजगीकरण होणार याकडे जनतेचे लक्ष लागले आहे. थोडक्यात पुढील काळात सरकारचे काही काम शिल्लक राहणार नाही का? भाडेतत्वावर चालेल का सर्व यंत्रणा ?

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!