छत्तीसगड येथे ८वी राष्ट्रीय थाईबॉक्सिंग स्पर्धा उत्साह मध्ये संपन्न..

महाराष्ट्र संघाने पटकवले प्रथम विजेतेपद, राष्ट्रीय स्पर्धेत उत्कृष्ट खेळाडू म्हणून महाराष्ट्रच्या इसकी तेवर याला बहुमान
प्रतिनिधी पिंपरी चिंचवड दि १० सप्टेंबर २०२६ छत्तीसगड येथील इंदिरा गांधी कृषी विश्वविद्यालय रायपूर छत्तीसगढ येथे राष्ट्रीय थायबॉक्सिंग स्पर्धेचे आयोजन दि. ४ ते ६ सप्टेंबर २०२६ दरम्यान करण्यात आले होते.
या स्पर्धेत २१ राज्यातून ६५० खेळाडूंनी सहभाग नोंदविला होता. सर्व खेळाडूंनी उत्कृष्ट कौशल्य सादर करत, दैदिप्यमान कामगिरी केली.
स्पर्धेत महाराष्ट्र संघाने प्रथम विजेतेपद पटकावले, छत्तीसगड द्वितीय, उत्तर प्रदेश तृतीय, आसाम चतुर्थ, व तामिळनाडू पाचवा क्रमांक मिळाला.
स्पर्धेत मान्यवर म्हणून प्रमुख पाहुणे खासदार बृजभूषण अग्रवाल, सन्माननीय अतिथी छत्तीसगड राज्य भाषा आयोग अध्यक्ष प्रभात मिश्रा, राज्यमंत्रि
आनंद निषाद अध्यक्ष मच्छीमार कल्याण मंडळ, राज्यमंत्रि
श्री. पी. वाय. अत्तर अध्यक्ष, थाई बॉक्सिंग इंडिया फेडरेशन, योगेश खराडे खजिनदार राष्ट्रीय थाई बॉक्सिंग असोसिएशन, सय्यद इम्रान महासचिव थाई बॉक्सिंग इंडिया फेडरेशन, गिरी राव संरक्षक छत्तीसगड थाई बॉक्सिंग असोसिएशन, दीपक प्रसाद अध्यक्ष छत्तीसगड थाई बॉक्सिंग असोसिएशन, सईद आलम मुख्य मार्गदर्शक म्युझिकल थाई राष्ट्रीय थायबॉक्सिंग असोसिएशन आदी मान्यवर उपस्थित होते.
तसेच महाराष्ट्र थाई बॉक्सिंग असोसिएशनचे कार्याध्यक्ष विशाल माळी , सचिव अजय खेडगरकर , खजिनदार गणेश मांढरे, यांनी खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.
स्पर्धेत उत्कृष्ट पंच म्हणून श्री. नाझीम शेख, अमोल माने, वजीर शेख, हरिओम चव्हाण, शितल साबळे, प्रियंका अचमट्टी, उपस्थीत होते. शुभांगी सहारे यांनी उत्कृष्ट कामगिरी बजावली तर स्पर्धेचे सूत्रसंचालन रवी साहू यांनी केले.
पिंपरी चिंचवड परिसरातील सुवर्णपदक विजेत्या खेळाडूंची नावे खालील प्रमाणे-
१९ वर्षाखालिल विजेत्यांची नावे खालील प्रमाणे
१) सार्थक उमेश मळेकर
वय: १७, सुवर्ण पदक
२) श्रावणी पापेश राजपूत
वय: १२, सुवर्ण पदक
३) जान्हवी शितल साबळे
वय: १७, सुवर्ण पदक
४) आर्यन नागेश शेंडगे
वय: १७, सुवर्ण पदक
५) इसक्की तेवर
वय: १७, सुवर्ण पदक
१९ वर्षावरील विजेत्यांची नावे खालील प्रमाणे
१) अमीन अत्तार- सुवर्ण पदक
२) असिफ शेख- सुवर्णपदक
३) अजित जैस्वाल- सुवर्णपदक
४) सुरज भोंडे- सुवर्णपदक
५) कृष्णा दिवेकर- सुवर्णपदक





