उत्सवमहाराष्ट्रशैक्षणिकसन- उत्सवसामाजिक

श्री गणेश मूर्तिकला कार्यशाळेतून वाळंज विद्यालयात साकारले बाप्पा..

प्रातिनिधी आंबवणे दि. ११ सप्टेंबर २०२६ विद्यार्थ्यांच्या हातून पर्यावरणपूरक गणेशमूर्तींची निर्मिती; संस्कृतीसोबत पर्यावरण संवर्धनाचा संदेश. सोनू अनाजी वाळंज माध्यमिक विद्यालय, आंबवणे येथे विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संवर्धनाची जाणीव निर्माण व्हावी आणि पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याचा संदेश रुजावा, या उद्देशाने श्री गणेश मूर्तिकला कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.
हा अभिनव उपक्रम मा. मंदाकिनी त्रिवेदी, शक्तियोग आश्रम आणि मा. वत्सलाताई वाळंज, अध्यक्षा – जाई वात्सल्य फाउंडेशन यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आला.
कार्यक्रमास आंबवणे केंद्राच्या शिक्षण केंद्र प्रमुख सौ. प्रीती खुटाडे मॅडम, सौ. मीरा जोशी, विद्यालयाचे मुख्याध्यापक मा. श्री. भटू देवरे, अनेरी शेठ यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
“गणेशोत्सव म्हणजे केवळ उत्सव नाही, तर तो आपल्या संस्कृतीशी जोडणारा आणि समाजाला एकत्र आणणारा उत्सव आहे. विद्यार्थ्यांनी पर्यावरण रक्षणासाठी मातीच्या गणेशमूर्तीची स्थापना करण्यासाठी पुढाकार घ्यावा,” असे प्रतिपादन केंद्र प्रमुख सौ. प्रीती खुटाडे यांनी मार्गदर्शन करताना केले.
कार्यशाळेत विद्यार्थ्यांनी शाडू मातीपासून स्वतःच्या हातांनी गणेशमूर्ती साकारत उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. बाप्पाची मूर्ती घडवताना विद्यार्थ्यांनी पर्यावरण रक्षण, सामाजिक सलोखा आणि संस्कृती संवर्धनाचा सुंदर संदेश दिला. यावेळी श्री गणेशाच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
अनेरी शेठ मॅडम यांनी श्री गणेशाच्या सर्वांगाचे महत्त्व विषद केले. संजय कुलथे यांनी सूत्रसंचालन करून कार्यक्रमाची रूपरेषा स्पष्ट केली.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रवींद्र सोनवणे, बाळासाहेब खेडकर, राहुल आवळे, विजय दळवी, शालिनी देवरे, संतोष दळवी, महादेव खेडकर, मंदा दळवी आणि अरुणा दळवी यांनी सहकार्य केले.
विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे कार्यशाळेला उत्साहाचे स्वरूप प्राप्त झाले.
मातीचा बाप्पा… पर्यावरणाचा रक्षक!
पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश देणारा हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी आनंददायी, संस्कारक्षम आणि प्रेरणादायी ठरला. शेवटी स्नेहभोजनाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button