क्रीडापिंपरी चिंचवड मनपा.महाराष्ट्रविशेषशहरशैक्षणिकसामाजिक

पिंपरी-चिंचवडमध्ये शालेय जिल्हास्तरीय बास्केटबॉल स्पर्धेला उत्साहात प्रारंभ

प्रातिनिधी पिंपरी-चिंचवड दि. २० सप्टेंबर २०२६  पिंपरी-चिंचवड महानगरपालिका व पुणे जिल्हा क्रीडा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शालेय जिल्हास्तरीय बास्केटबॉल स्पर्धेला काल सेंट उर्सुला हायस्कूल, निगडी येथे उत्साहात प्रारंभ झाला. ही स्पर्धा दि. १९ ते २७ सप्टेंबर २०२६ या कालावधीत होणार असून, १४, १७ व १९ वर्षांखालील मुले व मुली अशा विविध वयोगटांमध्ये स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
स्पर्धेचे उद्घाटन पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या उपमहापौर सौ. शर्मिलाताई बाबर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी क्रीडा समिती सभापती श्री. कैलास कुटे, प्रशासन अधिकारी (क्रीडा) श्री. दत्तात्रय सूर्यवंशी यांच्यासह क्रीडा विभागातील अधिकारी, कर्मचारी, प्रशिक्षक, खेळाडू व क्रीडाप्रेमी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक क्रीडा पर्यवेक्षक श्री. अरुण कडूस यांनी केले, तर सूत्रसंचालन श्रीमती सुनीता पालवे यांनी केले. उद्घाटनप्रसंगी श्री. राजेंद्र महाजन, श्री. सचिन ववले, श्री. निखिल सरीन, श्रीमती रोहिणी कदम, श्रीमती वर्षा थोरात तसेच त्यांचे सहकारी उपस्थित होते.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी सहभागी खेळाडूंना शुभेच्छा देत, शालेय विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी क्रीडा क्षेत्राला प्रोत्साहन देणे आवश्यक असल्याचे सांगितले. अशा स्पर्धांमुळे विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, संघभावना, आत्मविश्वास आणि नेतृत्वगुण विकसित होण्यास मदत होते.

१९ वर्षांखालील मुलांच्या सामन्यांचे निकाल

१. सिम्बायोसिस ज्युनिअर कॉलेज विजयी विरुद्ध कमलनयन बजाज हायस्कूल – १४-०८

२. इंदिरा स्कूल विजयी विरुद्ध जय हिंद हायस्कूल – २०-००

३. अक्षरा इंटरनॅशनल स्कूल विजयी विरुद्ध साधू वासवानी स्कूल – १८-०६

४. कमलनयन बजाज हायस्कूल विजयी विरुद्ध ज्युनिअर कॉलेज – १४-०८

१९ वर्षांखालील मुलांच्या पुढील सामन्यांचे निकाल

१. सिटी प्राईड ज्युनिअर कॉलेज विजयी विरुद्ध इंदिरा नॅशनल स्कूल – १३-०५

२. नोव्हेल ज्युनिअर कॉलेज विजयी विरुद्ध क्रीम सन अँड शॉप ग्लोबल स्कूल – ०८-०४

३. सेंट उर्सुला हायस्कूल विजयी विरुद्ध नोव्हेल ज्युनिअर कॉलेज – २६-००

४. एल प्रो स्कूल, चिंचवड विजयी विरुद्ध सिम्बायोसिस ज्युनिअर कॉलेज – २७-१०

सदर जिल्हास्तरीय स्पर्धेत पुणे जिल्ह्यातील विविध शाळा व महाविद्यालयांतील खेळाडू मोठ्या उत्साहाने सहभागी झाले असून, आगामी सामन्यांमध्येही चुरशीच्या लढती पाहायला मिळणार आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button