गणेशोत्सवात जनसेवा न्यासाच्या कार्यक्रमात मधु ताराची प्रमुख उपस्थिती..

प्रतिनिधी पूणे दि. २१ सप्टेंबर २०२६ पुणे महानगर पालिकेच्या बंटर शाळा हडपसर पुणे येथील जनसेवा न्यास आकांक्षा प्रकल्प या संस्थेच्या माध्यमातून प्रकल्प समन्वयक सौ. रुपालीताई विटकर यांच्या आयोजनातून गणपती आरतीच्या निमित्ताने घेण्यात आलेल्या कार्यक्रमात दरवर्षी प्रमाणे याही वर्षी मधु तारा दिव्यांग सेवा सोशल फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य यांना प्रमुख अतिथी म्हणून आमंत्रित करण्यात आले.
या शुभ प्रसंगी मधु तारा प्रमुखांसह मधु तारा पुणे जिल्हा प्रमुख श्री अनिलजी दांगडे उपस्थित होते.
पुणे शहर तसेच हडपसर पोलिस स्टेशनचे निवृत पोलिस अधिकारी श्री रामदास गद्रे सर यांची त्यांच्या सुवैद्य पत्नी यांच्या समवेत प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
या वेळी मधु तारा प्रमुख श्री नितीनजी शिंदे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत आज देवाला सुट्टी आहे ही कविता सादर केली.
श्री गद्रे साहेब यांचेही मोलाचे मार्गदर्शन लाभले.
जनसेवा न्यास आकांक्षा प्रकल्प यांच्या माध्यमातून गरीब वस्तीतीतील १ ली ते १० वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी संस्कृत विद्या, अथर्व शिष्य पठण संस्कार वर्ग तसेच मानव कल्याणाच्या अनेक प्रकल्पांवर कार्य केले जाते.
या संस्थेच्या प्रकल्प समन्वयक म्हणून सौ रुपालीताई विटकर यांच्या आयोजनातून दरवर्षी प्रमाणे याही वर्षी गणेशोत्सवात कार्यक्रमाचे आयोजन केले गेले.
या वेळी संस्थेच्या सौ शीतलताई धुमाळ आणि पदाधिकारी उपस्थित होते



