आरोग्यनाशिकमहाराष्ट्रविशेषशहरसामाजिक

‘निरोगी शरीर, निरोगी मन’-हाच सुखी जीवनाचा आधार. मा. महापौर रंजनाताई भानसी

नाशिक मधील महाआरोग्य शिबीर कार्यक्रमात ४५० रुग्णांनी घेतला लाभ..

प्रतिनिधी नाशिक दि. १४ ऑक्टोबर २०२६ डॉ. बाबासाहेब आंबेडकर वैद्यकीय प्रतिष्ठान संचलीत श्री गुरुजी रुग्णालय, नाशिक, रेड स्वस्तिक सोसायटी, भारत व ज्ञानगंगा ज्येष्ठ नागरिक मोफत फिरते वाचनालय, श्रीरामनगर यांच्या संयुक्त विद्यमाने श्रीराम नगर, बोरगड, नाशिक येथे महाआरोग्य शिबिर कार्यक्रम संपन्न झाला.

या कार्यक्रमास उद्घाटनप्रसंगी माजी महापौर रंजनाताई भानसी उपस्थित होत्या. यावेळी ज्ञानगंगा वाचनालयाचे अध्यक्ष तथा माजी विभागीय पोलीस अधिकारी प्रभाकर रायते, माजी उपायुक्त रेड स्वस्तिक सोसायटी नाशिक विभागाचे कार्यकारी अध्यक्ष जे. बी. पाटील, समितीचे संचालक. सुरेश जाधव, पुंडलिक भोंडवे, अनिल घुले, आप्पा बागुल, विठ्ठल दळवी, रंजना खरात, चंद्रकांत बागुल सह समितीचे पदाधिकारी उपस्थित होते. तसेच, श्री गुरुजी रुग्णालयाचे कार्यपालन अधिकारी मकरंद धर्माधिकारी, नगरसेविका दिपालीताई गिते, नगरसेवक प्रविण जाधव, व जेष्ठ नागरिक, अधिकारी, पोलिस प्रशिक्षणार्थी विद्यार्थी पदाधिकारी, समाजसेवक श्रीराम नगर म्हसरूळ म्हसोबा वाडी बोरगड परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने आरोग्य तपासणीसाठी उपस्थित होते.

भानसी यावेळी मनोगत करतांना म्हणाल्या की, यावेळी माजी महापौर रंजनाताई भानसी यांनी आपल्या आरोग्याची काळजी ही कुंटुंबासाठी, स्वत:साठी आणि समाजासाठी घेणे ही काळाची गरज आहे. तसेच, निरोगी शरीर, निरोगी मन-हाच सुखी जीवनाचा आधार आहे. यामुळे आपले दैनंदिन जीवन जगतांना प्रत्येक नागरिकांनी आपल्या शरीराची काळजी घेणे आवश्यक आहे. निरोगी शरीर व निरोगी मनामुळे आपण दैनंदिन जीवन आनंदी जगण्यास मदत होईल. उत्तम आरोग्य, हीच यशाची गुरुकिल्ली असून, आपल्या उत्तम आरोग्यासाठी मोफत महाआरोग्य शिबीराचा लाभ घेण्याचे आवाहन केले. यावेळी विशेष करून म्हसोबा वाडी, ग्रामीण बोरगड श्रीराम नगर, म्हसरूळ येथील महिला पुरुष आदिवासी गरजू गोरगरीब जनतेने जवळपास ४५० रूग्णांनी या शिबिरातून तपासणी करण्यात आली असल्याचे आवर्जुन रंजनाताई भानसी यांनी सांगीतले.
सौ. दिपालीताई गिते नगरसेविका यांनी ज्ञानगंगा जेष्ठ नागरिक फिरते वाचनालयाच्या कार्यालयास भेट देऊन समाधान व्यक्त केले.
या कार्यक्रमावेळी सौ. दिपालीताई यांनी श्रीराम नगर चौफुली फलकाचे फित कापून अनावरण करण्यात आले. तसेच, नगरसेवक प्रविण जाधव यांनी शिबिराच्या स्थळी भेट देऊन पाहणी केली तसेच आरोग्य तपासणी बाबत वैद्यकीय पथकास मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माजी जिल्हा नियोजन अधिकारी गोणिराम शिंदे यांनी केले. तर आभार ज्ञानगंगा वाचनालयाचे सचिव तथा जनसंपर्क अधिकारी साहेबराव जगताप यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button