१० व्या फ्लाइंग किक राष्ट्रीय स्पर्धेमध्ये महाराष्ट्राच्या संघाने घवघवीत यश संपादन करत राज्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला..

या स्पर्धेत महाराष्ट्राच्या खेळाडूंनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत सुवर्ण व रौप्य पदकांची कमाई केली.
मध्य प्रदेशने प्रथम क्रमांक पटकावला, महाराष्ट्र द्वितीय आणि छत्तीसगड तृतीय स्थानावर राहिला.
प्रतिनिधी जबलपूर दि. १४ ऑक्टोबर २०२६ जबलपूर येथील रानीताल क्रीडा परिसरातील क्रीडा एवं युवा कल्याण विभागाच्या इनडोअर स्टेडियममध्ये आयोजित १० वी राष्ट्रीय फ्लाइंग किक स्पोर्ट्स स्पर्धा – २०२६ चा शनिवार आणि रविवारी नॅशनल स्पर्धा (nationl turnament) झाली.
समारंभाचे प्रमुख अतिथी म्हणून आमदार अभिलाष पांडे, आमदार लखन घनघोरिया, आमदार अमरीश मिश्रा, तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आयोजक संस्थेचे अध्यक्ष सत्येंद्र ज्योतिषी होते. यावेळी मध्य प्रदेश उच्च न्यायालयाचे अधिवक्ता संजय अग्रवाल, आयोजक उपाध्यक्ष विवेक रंजन शुक्ला, प्रमुख क्षेत्र सिंह महेला आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
स्पर्धेमध्ये मध्य प्रदेशने प्रथम क्रमांक मिळवून विजेतेपद पटकावले. महाराष्ट्राने द्वितीय, तर छत्तीसगडने तृतीय स्थान मिळवले. हरियाणा चौथ्या, दिल्ली पाचव्या, राजस्थान सहाव्या, तेलंगणा सातव्या आणि ओडिशाने आठव्या क्रमांकावर स्थान मिळवले.
या स्पर्धेत देशातील विविध राज्यांतील खेळाडूंनी सहभाग घेतला. खेळाडूंनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करून आपले कौशल्य दाखवले. स्पर्धेच्या माध्यमातून खेळाडूंना राष्ट्रीय स्तरावर आपली प्रतिभा दाखवण्याची संधी मिळाली.
महाराष्ट्र, हरियाणा, उत्तर प्रदेश, छत्तीसगड, ओडिशा, पुद्दुचेरी आणि तेलंगणा येथील खेळाडूंनी स्पर्धेत सहभाग घेतला. सुमारे २५० खेळाडू सहभागी झालेल्या या स्पर्धेचे आयोजन राष्ट्रीय स्तरावर विशेष महत्त्वाचे ठरले.
स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी आयोजक समिती, प्रशिक्षक, तांत्रिक अधिकारी, पंच आणि सहकाऱ्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले. विजेत्या खेळाडूंना पदके आणि प्रमाणपत्रे देऊन गौरविण्यात आले.
या स्पर्धेमुळे खेळाडूंमध्ये क्रीडाभावना, शिस्त, आत्मविश्वास आणि राष्ट्रीय स्तरावर खेळण्याची प्रेरणा वाढली. युवकांना राष्ट्रीय स्तरावर आपली प्रतिभा दाखवण्याची संधी मिळावी, हा या आयोजनामागील मुख्य उद्देश होता.
जबलपूरमध्ये राष्ट्रीय खेळांना प्रोत्साहन देण्याचा पुढाकार
या स्पर्धेच्या यशस्वी आयोजनामुळे जबलपूरमध्ये राष्ट्रीय स्तरावरील खेळांना प्रोत्साहन मिळाले. स्थानिक खेळाडूंना देशातील विविध राज्यांतील खेळाडूंसोबत स्पर्धा करण्याची संधी मिळाली.
आयोजकांनी स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व खेळाडूंचे, प्रशिक्षकांचे, तांत्रिक अधिकाऱ्यांचे, पंचांचे आणि सहकाऱ्यांचे आभार मानले.
एमपी (मध्य प्रदेश) स्पर्धेतील सहभागी खेळाडूंची यादी
१. आरुष गाडेकर- सुवर्ण पदक
२. अक्षता बगाडी – सुवर्ण पदक
३. अवधूत बगाडी- सुवर्ण पदक
४. अर्नवी लोहार – सुवर्ण पदक
५. लावण्या थोरात- सुवर्ण पदक
६. कार्तिक सुराडकर- सुवर्ण पदक
७. सैराज साळुंके- सुवर्ण पदक
८. अथर्व सातकर- सुवर्ण पदक
९. माधवराज आसबे- सुवर्ण पदक
१०. अर्णव इंगळे- सुवर्ण पदक
११. नवनाथ कंदुकातले- सुवर्ण पदक
१२. रुद्र खरात- सुवर्ण पदक
१३. अनन्या तोळमारे- सुवर्ण पदक
१४. ऐश्वर्या जगताप- सुवर्ण पदक
१५. प्रेम गोटे- रौप्य पदक
१६. पृथ्वीराज राजपूत- रौप्य पदक
१७. काशिफा मकदुमवाले- सुवर्ण पदक
१८. रिदिमा नवले- सुवर्ण पदक
एकूण पदकांची संख्या
* सुवर्ण पदके: १६
* रौप्य पदके: २
* एकूण खेळाडू: १८
* या विद्यार्थ्यांना मुख्य प्रशिक्षक साबीर शेख, तसेच प्रशिक्षक प्राजक्ता जगताप, सार्थक पांचाळ, स्नेहल बामले आणि खुशी शेख यांचे अमूल्य मार्गदर्शन लाभले
.



