
प्रतिनिधी पुणे, दि. १७ ऑक्टोबर २०२६ मूकनायक न्युज पेपरचे वरिष्ठ पत्रकार व अनुवाद आपला न्युजचे संपादक लक्ष्मण रोकडे यांना मराठी फिल्म इंडस्ट्री बचाव आंदोलन या संस्थेच्या राज्य मिडिया समन्वयक संचालक
या पदावर नियुक्त करण्यात आले
आहे.
रोकडे हे साधारण २५ ते ३० वर्षापासून पत्रकारिता करत असून सोबत मराठी फिल्म इंडस्ट्रीत बराच काळ सदस्य म्हणूनही कार्यरत आहेत. मराठी चित्रपट सृष्टीच्या जतन, संवर्धन आणि विकासासाठी वेगवेगळ्या उपक्रमांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग राहिला आहे. त्यांच्या पत्रकारितेचा दीर्घ अनुभव व चित्रपट क्षेत्रातील दांडगा संपर्क लक्षात घेऊन ही नियुक्ती करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.
मराठी फिल्म इंडस्ट्री बचाव आंदोलन कमिटीचे प्रसाद इंगवले यांनी काल रोकडे यांना मराठी फिल्म इंडस्ट्री
बचाव आंदोलन संस्थेच्या राज्य मिडिया समन्वयक संचालक या पदावर नियुक केल्याचे, संस्थेचे समन्वयक सचिन पिंपरीकर यांच्या माध्यमातून कळविण्यात आले आहे.
रोकडे यांच्या नियुक्तीमुळे मराठी फिल्म इंडस्ट्रीच्या चळवळीला नवीन बळ मिळणार असल्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.



