आंदोलनपिंपरी-चिंचवडमहाराष्ट्रविशेषशहरसामाजिक

संविधान संपवायला निघालेल्या भाजपाला संविधान संपवणे शक्य नसल्याने भाजप नेते संविधानाचे शिल्प तोडतात का?- बी. बी. शिंदे

प्रतिनिधी पिंपरी- चिंचवड दि. २७ ऑक्टोबर २०२६ मागील सप्ताहात म्हणजे दि. १४ आक्टोबर २०२६ धम्मचक्र परिवर्तन दिनाच्या आधी १३ ऑक्टोबर रोजीच जुनी सांगवी येथील संविधान चौकातील भारतीय संविधानाचे शिल्प बुलडोझरच्या साह्याने माडतोड करण्यात आले. संविधान शिल्प ही सदरील ठिकाणच्या जबाबदार महानगर पालिकेच्या नगरसेविका सौ.तृप्ती कांबळे यांनी जाणिव पुर्वक तोडून पळवून नेलेले आहे.
या देशद्रोही कृत्या विरोधात व त्यांच्या या मनमानी कृत्याचा जाहीर निषेध करण्यासाठी गेली पाच दिवसांपासून भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या पिंपरी चिंचवड शहरचे अध्यक्ष मा. आयु. नरेंद्र बनसोडे आणि काँग्रेस पक्षाच्या सर्व टीमने सदरील ठिकाणी बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे.
त्याचा आज सहावा दिवस आहे.
या जाहीर निषेध आंदोलनास शहरातील सर्व सामाजिक संघटना, संस्था यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या या बेमुदत निषेध आंदोलनास जाहीर पाठिंबा देऊन, दररोज स्वतः उपस्थित राहून या अशा संविधान विरोधी कृत्यांचा जहीर निषेध व्यक्त करण्यात येत आहे. तसेच सौ. तृप्ती कांबळे या नगरसेविका विरोधात जोपर्यंत पोलीस एफ. आय. आर. दाखल करुन त्यांना कोर्टात हजर करत नाहीत. तसेच यांनी जे हे असे संविधान विरोधी, संविधानाचे शिल्प बुलडोझर लावून उध्वस्त केले आहे. ते परत जसे होते तसेच पुर्ववत करून देण्यात येत नाही. तोपर्यत हे धरणे आंदोलन सुरूच रहाणार आहे असेही बनसोडे यांनी जाहीर केले आहे.
आजच्या सहाव्या दिवशी या कृत्याचा निषेध करण्यासाठी सदरील ठिकाणचा पाळीव प्राणी ( श्वान ) मोत्या हा सुद्धा या धरणे आंदोलन स्थळी उपस्थित राहून संकेत देत होता की ज्या संविधानामुळे केवळ तुम्ही मानव प्राणीच सुरक्षित नसुन, आम्ही पाळीव प्राणी पण सुरक्षित आहोत.
या जबाबदार महानगर पालिकेच्या नगरसेविका सौ.तृप्ती कांबळे या संविधानामुळेच केवळ एक स्त्री असतांना नगरसेविका झाल्या आहेत. याच ही भान यांना राहिले नाही का? याचेच आश्चर्य मला वाटते, असे उपस्थित राहून आज मोत्या सांगत असावा. या घटनेकडे विशेष लक्ष देऊन पिंपरी चिंचवड महापालिकेच्या आयुक्त तसेच पोलीस आयुक्त यांनी या अशा अघोरी कृत्य करणाऱ्या नगरसेविका तृप्ती कांबळे यांना अटक करुन त्यांचे नगरसेवक पद रदद् करून कायदेशीर कारवाई करण्यात यावी.
यावेळी सदरील ठिकाणी उपस्थित असनारे मान्यवर —
मा. आयु. नरेंद्र बनसोडे शहराध्यक्ष पिंपरी चिंचवड शहर काँग्रेस कमिटी, अभिमन्यू दहितुले आण्णा माजी सभापती पिंपरी चिंचवड महापालिका, विजय निकाळजे, हरिष डोळस भोसरी ब्लोक अध्यक्ष, नितीन सोनवणे पदाधिकारी काँग्रेस, नबीलाल मुल्ला सरचिटणीस पिंपरी चिंचवड शहर, सुरज माने चिंचवड ब्लॉक अध्यक्ष, डेनिस देवासन पदाधिकारी काँग्रेस, सदाशिव तळेकर उपाध्यक्ष पिंपरी चिंचवड शहर, सुरेश बावनकर कार्याध्यक्ष अ.नि.स. पिंपरी चिंचवड शहर, सिमा बावनकर सामाजिक कार्यकर्त्या, हरिश्चंद्र शिंदे उपाध्यक्ष पिंपरी चिंचवड शहर, आणि महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सर्व हारा उत्कर्ष चिंतन समाज, सामाजिक संघटना, भिमरत्न प्रा.बी.बी. शिंदे संस्थापक सर्व हारा उत्कर्ष चिंतन समाज, सामाजिक संघटना, तुकाराम गव्हाणे सदस्य सर्व हारा उत्कर्ष चिंतन समाज, विक्रम वाघमारे अध्यक्ष भिमरत्न प्रतीष्ठाण, शिवाजी लोणके सामाजिक कार्यकर्ते, हिराचंद जाधव अध्यक्ष पिंपरी ब्लॉक, अँड. दिलीप शिंगोटे सामाजिक कार्यकर्ते, इत्यादी अनेक आंदोलनं कर्ते उपस्थित राहून तिव्र निषेध व्यक्त करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button