उत्सवमहाराष्ट्रविशेषसन- उत्सवसामाजिक

इंदापूर तालुक्यातील निमसाखर गावामध्ये कोजागिरी पौर्णिमा अति उत्साहात साजरी करण्यात आली.

प्रतिनिधी गणेश धनवडे इंदापूर दि. २९ ऑक्टोबर २०२६ परंपरेप्रमाणे श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पालखीची ग्राम प्रदक्षिणा काढण्यात आली. महादेव भजनी मंडळ उपस्थित होते पालखी मंदिरात आल्यानंतर श्री ह.भ. प.संभाजी महाराज देवकुळे भरणेवाडी यांचे स्वामी जीवन चरित्र प्रवचन झाले तसेच मंदिरातील आकर्षक अशा रांगोळीची सेवा सौ. शितल सुनील टकले यांनी केले तसेच स्वामींच्या हाराची सेवा श्री राजाराम संभाजी जाधव यांनी केली तसेच पालखीची सजावट नेहमीप्रमाणे श्री राजेंद्र मारुती घोडे यांनी केली. तसेच मंदिरामध्ये श्रींची आरती व जप करण्यात आला. आरती झाल्यानंतर सर्व स्वामी भक्तांना आझाद मित्र मंडळ राजे शिवाजी चौक पवार आळी यांच्यातर्फे महाप्रसाद देण्यात आला या महाप्रसादासाठी या मंडळातील सर्व महिलांनी सहभाग घेतला होता विशेष म्हणजे स्वामींचा हा महाप्रसाद मंडळातर्फे तीन वर्षे सलग दिला जात आहे. कोजागिरी पौर्णिमेनिमित्त मसाला दूध वाटप करण्यात आले. तसेच या कार्यक्रमास निमसाखर व पंचक्रोशीतील सर्व स्वामीभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.या कार्यक्रमास विशेष उपस्थिती वालचंदनगरचे स्वामी भक्त श्रीराम कुंभार सर व श्री. ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचे भक्त व प्रवचनकार श्री. रमेश महाराज कट्टे आवर्जून उपस्थित होते. तसेच निर्वांगीचे स्वामीभक्त श्री रोकडे बापू उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button