विशेषशहर

महापालिकेची संपत आलेल्या आर्थिक वर्षात अभूतपूर्व कर वसुली झाली…

पिंपरी-चिंचवड (प्रतिनिधी) 4,25,000 मिळकत धारकांनी मार्च अखेर २०२२-२३ या आर्थिक वर्षात कर भरला आहे. त्यामुळे गेल्या चाळीस वर्षातील विक्रमी ८१० कोटी रुपयांच्या मिळकतकराची वसुली झाली. गेल्या वर्षी ६२८ कोटी रुपये वसूल झाले होते. त्या तुलनेत संपत आलेल्या आर्थिक वर्षात ३५ टक्के अधिक कर महापालिकेच्या तिजोरीत जमा झाला. शहरात ५,९७,४८७ मिळकती आहेत.
मिळकत कर आकारणी व करसंकलन विभागाने तब्बल तेरा हजारांवर मिळकत धारकांना जप्तीबाबत पत्रे पाठवली होती. त्यातील दहा हजारांची अंमलबजावणी पूर्ण केली. दोन हजारांपेक्षा जास्त मालमत्ता सील केल्या. मिळकतकर आकारणी व करसंकलन विभागाच्या संपूर्ण सेवा ऑनलाईन होत्या. अनधिकृत बांधकाम शास्तीची टांगती तलवार कायमची दूर झाली, त्यामुळे मिळकतधारकांकडून सुमारे नव्वद टक्क्यांपेक्षा अधिक मूळ कर वसूल झाला आहे.
राज्य सरकाने ३ मार्च २०२३ पर्यंतच्या अवैध बांधकामांचा सरसकट शास्ती कर (दंड) माफ केला. याचा लाभ ३१,३११ मिळकतधारकांना मिळाला. यापैकी २३,५०० मालमत्ता धारकांनी १७० कोटी रुपये मूळकराचा भरणा केला. त्यांना २८० कोटी रुपयांचा शास्ती कर माफ झाला.
पुढील आर्थिक वर्षात कर संकलन विभागाला एक हजार कोटी रुपयांचे उद्दिष्ट दिले आहे. त्यासाठी निरंतर कर वसुली, सर्वंकष मालमत्ता सर्वेक्षण आणि माहितीचे प्रमाणीकरण अशी त्रिसूत्री आखणी आखली आहे. खास करून पाच कोटीपेक्षा जास्त रकमेच्या थकबाकीदारांवर लक्ष असेल. न्यायप्रविष्ट प्रकरणांचा नियमित आढावा घेतला जाईल. असे महापालिका प्रशासक शेखर सिंह यांनी पत्रकार परिषदेत सांगीतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!