महाराष्ट्रराजकीयविशेषशहरसामाजिक

जन्मदिनाच्या दिवशी कृषी खात्याच्या रूपाने या शेतकऱ्याच्या मुलाला विशेष गिफ्ट मिळाले..धनंजय मूंडे

प्रतिनिधी मूंबई जन्मदिनाच्या दिवशी कृषी खात्याच्या रूपाने या शेतकऱ्याच्या मुलाला विशेष गिफ्ट मिळाले, याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री मा.एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री मा.देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री मा.अजितदादा पवार यांचे मनस्वी आभार…!

आज मंत्रालयात जाऊन कृषी विभागाचा आढावा घेतला. मागेल त्याला शेततळे व मागेल त्याला ड्रीप, शेडनेट यांचे प्रलंबित अर्ज तातडीने निकाली काढावेत असे निर्देश विभागाला देण्यात आले. त्याचबरोबर विभागातील रिक्त पदांचाही अहवाल मागितला आहे.
राज्यात व विशेषकरून मराठवाड्यात पावसाचे प्रमाण अल्प आहे. शेतकऱ्यांनी संभाव्य नुकसान टाळण्यासाठी एक रुपयात पीकविमा अंतर्गत विमा अर्ज तातडीने भरून घ्यावेत. विमा भरताना कोणतेही ग्राहक सेवा केंद्र पैसे मागत असल्यास त्याची प्रशासनाकडे तक्रार करावी, त्याची तात्काळ दखल घेऊन कडक कारवाई करण्यात येईल.
राज्यात बोगस बियाण्यांच्या माध्यमातून कुठेही शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये, याबाबतही धडक कारवाया करण्याचे निर्देश विभागाला दिले आहेत. कृषी विभागाच्या शेतकरी हिताच्या अनेक प्रभावी योजना आहेत, त्यातील लाभार्थी संख्या वाढविण्यासाठीही आगामी काळात प्रयत्न केले जातील.
पेरणी पासून ते पिकाला योग्य भाव मिळवून देण्यापर्यंत सरकारची जबाबदारी निष्ठेने पार पाडून विभागाची प्रतिष्ठा वाढेल, असे कार्य सर्वांच्या सहकार्यातून नक्कीच करून दाखवू, असा विश्वास आहे. असे धनंजय मूंडे यांनी ट्विटकरून सांगीतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!