महाराष्ट्रविशेषशहरसामाजिक

अश्विन पोर्णिमा वर्षावास समाप्ती व प्रियदर्शी चक्रवर्ती सम्राट अशोक यांची धम्मदीक्षा या मंगलमय दिन कार्यक्रमाचे पिंपरीत आयोजन..

प्रतिनिधी पिंपरी-चिंचवड दि. ३०ऑक्टोंबर २०२३ परवा अश्विन पोर्णिमा वर्षावास समाप्ती दिन व प्रियदर्शी चक्रवर्ती सम्राट अशोक यांची धम्मदीक्षा या मंगलमय दिनाचे औचित्य साधून बुद्ध लेण्या मुक्ती आंदोलन समितीच्या वतीने विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक “भीमसृष्टी” पिंपरी येथे वर्षावास समाप्ती विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

प्रथम महिला लेणी प्रेमी यांनी विश्वरत्न परमपूज्य बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला. व स्मारकातील ऐतिहासिक बोधिवृक्षास पुष्पार्पण करून धूप दीप प्रज्वलित करण्यात आले. या नंतर प्रियदर्शी चक्रवर्ती सम्राट अशोक यांच्या प्रतिमेस लेणी प्रेमी राजू भालेराव व महायान मसुरे यांनी पुष्पहार अर्पण केला. व महिलांनी धूप दीप प्रज्वलित केले व सामुदायिक बुद्ध वंदना घेण्यात आली.

लेणी प्रेमी इतिहास प्रेमी राजू भालेराव यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले व या दिनाचे महत्त्व सांगितले.

पिंपरी चिंचवड मधील सामाजिक कार्यकर्ते राजन नायर यांनी वर्षावास समाप्ती व प्रियदर्शी चक्रवर्ती सम्राट अशोक यांनी घेतलेल्या धम्मदीक्षा विषयी सर्वांना शुभेच्छा दिल्या. लेणी प्रेमी महायान मसुरे यांनीही शुभेच्छा दिल्या तसेच प्रियाताई शेख. रेखाताई मेश्राम, मुस्कान शेख, यांनीही शुभेच्छा दिल्या. लेणी प्रेमी रवी कांबळे यांनीही या मंगलमय दिनाच्या शुभेच्छा दिल्या
तसेच लेणी प्रेमी इतिहास प्रेमी मनोज गजभार यांनी वर्षवास समाप्ती दिनानिमित्त व प्रियदर्शी चक्रवर्ती सम्राट अशोक यांच्या धम्मदीक्षा विषयी थोडक्यात मार्गदर्शन केले या नंतर नागपूर येथील आलेल्या रेखाताई मेश्राम व प्रतिभाताई चौरे यांनी या मंगलमयदिनी सर्वांना पेढे वाटून हा मंगलमय दिवस साजरा केला.

तसेच उपस्थित लेणीप्रेमी कौशल्य गजभार, राधा गायकवाड, जानकाबाई गजभार, वंदनाताई यंकुळे, यांनी भीम बुद्ध गीते गाऊन या कार्यक्रमाची शोभा वाढवली या वेळी सर्व लेणी प्रेमी सामाजिक धार्मिक राजकीय क्षेत्रातील मान्यवर तसेच पत्रकार बांधव उपस्थित होते.
यावेळी फोन काॅल द्वारे मूकनायकचे वरिष्ठ पत्रकार लक्ष्मण रोकडे यांनी उपस्थित सर्वांना शुभेच्छा दिल्या.
या वेळी प्रियाताई शेख, कौशल्या गजभार, रेखा मेश्राम, प्रतिभा चौरे, वंदनाताई यंकुळे, जानकाबाई गजभार, राधा गायकवाड, आम्रपाली शिंदे, मुस्कान शेख, तृप्ती शिंदे, अदि महिला उपस्थित होत्या.

राजू भालेराव, महायान मसुरे, राजन नायर, रवी कांबळे, राम बनसोडे, पत्रकार सुनील गायकवाड, सुरेश कांबळे, राजू सरतापे, रुद्र चौगुले, राम शिंदे, प्रकाश भोले, प्रणव वडमारे, समीर शेख, स्वामीनाथ वेंकुळे, मनोज गजभार, आर्यन शिंदे
इत्यादी या कार्यक्रमास उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!