देश-विदेशविशेषसामाजिक

शिवराय, फुले, शाहू ,डॉ. आंबेडकरांची विचारधारा मानणाऱ्या सर्व गट तटांनी एकत्र येवून लढा द्यावा.. प्रा.बी.बी. शिंदे

पिंपरी-चिंचवड (प्रतिनिधी) भारतीय संविधानाचे निर्माते डॉ. बाबासाहेब भीमराव आंबेडकर यांचा 132 वा जयंती उत्सव साजरा करत असतानाच, विषमतावादी भारतीय जनता पक्षाला त्यांची जागा दाखविण्या करिता छत्रपती शिवराय, फुले, शाहू, डॉ. आंबेडकर, यांची विचारधारा मानणाऱ्या सर्व गट तट, व राज्यस्तरीय आणि राष्ट्रीय पक्षांनी एकत्र येऊन लढा द्यायला हवा तरच भारतीय संविधानाचे खऱ्या अर्थाने रक्षण होईल. असे प्रा. बी. बी. शिंदे बोलले या वेळी ते पूढे असे ही बोलले..
आज सविधानच नव्हे तर देश देखील धोक्यात आला आहे. हे नव्याने सांगण्याची गरज नाही. लोकशाहीचे जे चार स्तंभ आहेत,१)विधिमंडळ २)कार्यपालिका ३)न्यायपालिका ४)प्रसारमाध्यमे
यावरच लोकशाहीचे भवितव्य अवलंबून असते, तेच या भाजपाने पूर्ण पने ताब्यात घेऊन त्यांची अगदी बेचीराख केले आहेत.
याचे मुख्य उदाहरण म्हणजे, “चोराला जर चोर म्हणायचे नाही, तर काय म्हणायचे” ?
मग चोराला काय साधू महाराज म्हणायचे की काय म्हणायचे .? चोराची व्याख्या करून आता भाजपानेच सांगावी सोबत वाॅशिंग मशिनचे विषयावर ही सा आमचा भाजपला प्रश्न आहे.??
मा. राहुल गांधी यांनी हाच तर वास्तव प्रश्न उपस्थित केला होता, म्हणून तर त्यांना गुजरात न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा सुनावली, त्यावर 24 तासात कार्यवाही करून भारतीय जनता पक्षाने त्यांची खासदारकी रद्द केली. म्हणजे आज अभिव्यक्ती स्वातंत्र्य खरच राहिले आहे काय ? आज खरे बोलण्यावर बंदी आहे काय ? उदया एकण्यावर बंदी घातली जाते की काय ? अशी भीती वाटू लागली आहे. ? राहुल गांधी हे कोण्या एका पक्षाचे प्रतिनिधी नसून, ते समता, स्वातंत्र, बंधुता, व सामाजिक न्यायचे पुरसकर्ते आहेत. हे त्यांनी भारत जोडो यात्रेतून दाखवून दिले आहे. आणि बीजीपीला हेच नको आहे.
त्यासाठी अश्या मनूस्मृतीपूरक घातकी, बहुजन समाजाला वेठीस धरणाऱ्या आणि भारतीयांना तसेच भारताला ध्वस्त, करु पहाणाऱ्या विषमतावादी शक्तीला पराभूत करुन, सत्तेबाहेर घालविण्या साठी, सर्व राष्ट्र प्रेमी राज्य प्रेमी, मानवता प्रेमी, संविधान प्रेमी जनतेने एकत्रित येऊन निकराचा लढा देणे गरजेचे आहे प्रा. बी. बी.शिंदे .
संस्थापक / अध्यक्ष सर्व हारा उत्कर्ष समिती चिंतनसमाज, सामाजिक संघटना ( महा. राज्य ).

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!