अभिनंदनदेश-विदेशमहाराष्ट्रमूंबईविशेषशैक्षणिकसामाजिक

डॉ. गणेश बारैया उंची तीन फूट फक्त पण कारनामे आकाशापेक्षा उंच..

प्रतीनिधी सतिश पाटील मुंबई दि. १९ ऑगस्ट २०२६ गुजरात मध्ये जन्म जन्मताच ७२% दिव्यांग दिडफुट्या म्हणून लोक हिनवत एका सर्कस मालकाने गणेश यांच्या वडिलांना पाच लाखात विकत द्या अशी बोली लावली पण ती बोली झुगारून माझा मुलगा शिकून मोठा कर्तबगार होणार असे उत्तर दिले आणि ते पूर्ण ही केले. जीवनात कधी हार मानू नये जे देवाने दिले त्याचे सोने करण्याची ताकत तुमच्यात आहे फक्त मेहनत व चिकाटी सोडू नये यश नक्कीच मिळते हे सिध्द केले.
डॉ. गणेश बारैया यांची उंची फक्त ३ फूट आहे आणि वजन सुमारे २० किलो आहे. गुजरातच्या भावनगर येथील राहणारे गणेश यांनी ७२% दिव्यांग असतानाही प्रचंड संघर्ष करून एमबीबीएस (MBBS) पूर्ण केले आणि ते शासकीय वैद्यकीय अधिकारी (Medical Officer) म्हणून कार्यरत आहेत. संघर्ष आणि शिक्षण लहानपणापासूनच उंची न वाढल्यामुळे आणि शारीरिक व्यंगांमुळे त्यांना अनेक संकटांचा सामना करावा लागला. नीट (NEET) परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतरही, कमी उंचीमुळे आपत्कालीन स्थिती हाताळता येणार नाही असे कारण देत वैद्यकीय परिषदेने त्यांना प्रवेश नाकारला होता. तरी देखिल हार न मानता त्यांनी सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) लढा दिला आणि २०१८ मध्ये त्यांच्या बाजूने ऐतिहासिक निकाल लागला. त्यानंतर त्यांनी भावनगरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून आपले एमबीबीएस शिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button