पिंपरी प्रतिनीधी- उपोषण कर्ते सर्व कामगार दहा ते पंधरा वर्षांपासून “Mindspace hotels and resorts Private Limited” या संस्थेत काम करीत आहोत, दिनांक १८-०३-२०२० रोजी देशात Lockdown व Covid-19 यामुळे ही संस्था तात्पुरत्या स्वरूपात बंद करण्यात आली आहे, अशी सूचना सर्व कामगारांना लिखित स्वरूपात सूचना फलकावर लावून कळवण्यात आली होती, तसेच सुचनेनुसार कामगारांना त्यांचे मानधन व व पुन्हा कामावर रुजू होण्याबाबतचा तपशील देखील सुचित करण्यात आला होता. असे असताना आज पर्यत ही संस्था पुन्हां चालु झाली नाही. आता कोरोनाची स्थिती आटोक्यात येऊन सर्व उद्योग व व्यवस्थापन पुन्हा पूर्वी सारखे सुरू झाले आहे. परंतु आमच्या व्यवस्थापनाकडून व मालकांकडून आम्हाला कामाबाबतीत अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही. तसेच आम्ही अजून किती दिवस व्यवस्थापन सुरू होण्याची वाट पहावी? आमच्यावर उपासमारीचे व आर्थिक परिस्थितीचे संकट उभे राहिले आहे. आमच्या वरती कमीत कमी चार ते पाच लोकांची जबाबदारी आहे. वेतन न मिळाल्यामुळे वाढलेले कर्ज, आई वडिलांच्या दवाखान्याचा खर्च मुलांच्या शाळेचा खर्च अशा गोष्टीने आम्ही मानसिक तणावा खाली गेलो आहोत. आम्ही सर्व कामगार आमच्या कामाचा मोबदला मागण्यास मालकांस संपर्क केला असता आम्हांस कोणतेही उत्तर मिळत नाही, आम्ही कामगार आयुक्त कार्यालय वाकडेवाडी पुणे, इथे लिखित तक्रार केल्या परंतु तिथे सुद्धा काही साध्य झाले नाही, मालकांस वारवार विनंती करून देखील मालक कोणतेही उत्तर देत नाही, तसेच मालकाने vendor लोकांचे पैसे दिले आहेत परंतु १२० कामगार लोकांचे Graduaty, कामगारांचा Leave lencashment, PF नअदा केलेले पैसे, कामगारांना त्यांच्या उर्वरित आयुष्याचा मोबदला, हे पैसे देणे बाकी आहेत, तरी आपण आम्हास हे पैसे मिळवून देण्यास साहाय्य करावे, आम्ही सर्व कामगार खूप त्रासलेले आहेत व या त्रासाला कंटाळून आम्ही आत्महत्या करण्यास प्रवृत्त होत आहोत, जर आमच्या तिल कोणी आत्महत्या केलीच तर त्या आत्महतेस पुर्णपणे श्री. आशिष भांडारी प्रशांत भंडारी व श्री. केतन टक्कर हे असतील, तरी आमचा मोबदला मिळवण्यास मदत कारवी व आम्हास येत्या पंधरा दिवसात याचा निकाल पोलिस व इतर यंत्रनेने द्यावा तो पर्यंत आम्ही डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक पिंपरी महानगरपालिका समोर आमरण उपोषण करत राहू असे उपोषण कर्त्ये सांगत हो या वेळी प्रमोद पारथी, केशव पाटील, महेन्द्र लोहार, सुरेश कुमार, शिवाजी येंगाड, पंकज दास, संतोष चव्हान, जाविर चंद्रकांत, मजुनाथ गोनाळे, सुनिल सुर्यवंशी, सुरेखा फुलावले, शांताबाई इंगवले
दादाराव फोडेकर, लक्ष्मण गेडेकर, बाबासाहेब यादव
शक्ती भालेराव, विनोद मोरे सोमनाथ गायकवाड, सदिप गायकवाड, सुशिल रोडे, लखन उबरे, सरफराज शेख बेग, सुरेश वर्मा हे उपोषण कर्ते उपस्थित होते.




