आरोग्यमहाराष्ट्रविशेषसामाजिक

पाळीव प्राण्यांसाठी प्रत्येक जिल्ह्यात रुग्णालये उभारा – युवराज दाखले

प्रतिनिधी मुंबई, दि. ०१ फेब्रुवारी २०२५ राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात पाळीव प्राण्यांसाठी रुग्णालय उभारण्याच्या सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रशासनाला द्याव्यात अशी विनंती शिवशाही व्यापारी संघ संस्थापक/अध्यक्ष लोकसेवक युवराज दाखले यांनी केली आहे.
दाखले म्हणाले की, पाळीव प्राणी जखमी झाल्यास अथवा त्यांच्या आजारपणात उपचारासाठी पशुसंवर्धन विभागाकडे तज्ज्ञ उपलब्ध असून राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात यासाठी रुग्णालये उभारण्याचा प्रस्ताव तयार करावा. तसेच पशुसंवर्धन विभागातील मनुष्यबळाची रिक्त पदे तातडीने भरण्यासंदर्भात कार्यवाही पूर्ण करावी अशी मागणी करून पशुसंवर्धन व्यवसायाला कृषि व्यवसायाचा दर्जा देण्यासंदर्भातील प्रस्ताव तयार करण्याचेही दाखले यांनी निवेदनात म्हटले आहे.
प्रामुख्याने राज्यातील पशुधन वाढविण्यासाठी पशुसंवर्धन विभागाने गायी पैदासीसाठी स्वतःची यंत्रणा उभारावी. तसेच गायी पैदासीसाठी शेतकऱ्यांचा सहभाग घ्यावा. तसेच चारा उपलब्ध व्हावा, यासाठी चारा व्यवस्थापन करावे. चारा उत्पादनासाठी जमीनींची उपलब्ध करून घेऊन उत्पादन वाढवावे. विदर्भ व मराठवाडा दुग्ध विकास प्रकल्प टप्पा दोन राबविताना इतर विभागांचेही सहाय्य घेण्यात यावे, अशी मागणी युवराज दाखले यांनी मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या कडे केली आहे.
तसेच शेळ्यांमधील देवी/लंपी चर्मरोग प्रतिबंधक लस निर्मिती लवकर करण्यात यावी. राष्ट्रीय संदर्भ लस चाचणी प्रयोगशाळा लवकर कार्यान्वित करण्याचे नियोजन करावे. लाळ खुरकत व पीपीआर प्रतिबंध लसीकरण मोहीम राबवावी. बर्ड-फ्ल्यूसारखे रोग पसरू नयेत, यासाठी काळजी घ्यावी, अशी मागणीही शिवशाही व्यापारी संघ संस्थापक अध्यक्ष लोकसेवक युवराज दाखले यांनी मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्या कडे केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!