गून्हामहाराष्ट्रविशेषशहर

घरफोडी करणार्‍या सराईत गुन्हेगाराकडुन घरफोडीचे एकुण १८ गुन्हे उघड ४५,३३,४००/- लाख किंमतीचे १ किलो ७ तोळे २ ग्रॅम सोने, रोख रक्कम केली जप्त..

प्रतिनिधी पिंपरी चिंचवड दि. १४ जानेवारी २०२४ मा. पोलीस आयुक्त सोो, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय यांनी पिंपरी पोलीस आयुक्तालय हद्दीमध्ये वाढलेल्या घर फोडीच्या गुन्हयामध्ये प्रतिबंध आणणेकामी सुचना व मार्गदर्शन केल्यानंतर वरीष्ठ पोलीस निरीक्षक, महाळुंगे एमआयडीसी पोलीस स्टेशन यांचे मार्गदर्शनाखाली महाळुंगे एमआयडीसी पोलीस स्टेशन गु.र.नं. ८६५/ २०२३ भा.द.वि.क. ४५७,३८० गुन्हयामध्ये अज्ञात आरोपी याचा शोध घेत असताना घटनास्थळावरील सी सी टि व्ही फुटेज सलग ९ दिवस पाहणी करीत असताना एक इसम लाल रंग असलेल्या व्हिलच्या स्कुटीवर संशयित रित्या येवुन बंगल्याची रेकी करत असल्याचे दिसुन आले.
त्याअनुशंगाने मौजे मोई, कुरुळी, चिंबळी फाटा येथील सीसीटिव्ही फुटेज पाहत असताना चिंबळी फाटा ते कुरुळी गावाकडे जाणारे रोडवर डोंगरवस्ती येथे एक इसम लाल रंग असलेल्या व्हिलच्या स्कुटीवर दिनांक ०२/०१/२०२४ रोजी १८/०० वाजताचे दरम्यान संशयित रित्या फिरत असताना आढळुन आल्याने त्यास तपास पथकातील अंमलदार यांनी पकडण्याचा प्रयत्न केला असता तो स्कुटी घेवुन पळुन जावु लागल्याने त्यास शिताफीने पाठलाग करुन आरोपी नामे आमिर शब्बीर शेख, वय २५ वर्षे, रा. सध्याचा पत्ता सेक्टर २५, निगडी प्राधिकरण, ता. हवेली जि. पुणे मुळगाव वडेश्वर काटे, वडगाव मावळ, पुणे यास पकडुन त्याचेकडुन दाखल गुन्हयातील चोरीस गेलेले २९,०३,४००/- रुपये ४७.८ तोळे वजनाचे सोने त्यात सोन्याचे गंठण, मिनी गंठण, राणीहार, चैन, अंगठया कानातील कर्णफुले जोड, बांगडया, ब्रेसलेट कडे व रोख रक्कम ३,००,०००/- लाख रुपये व गुन्हयात वापरलेली मोटार सायकल जप्त करण्यात आली असुन त्याचे कडे सखोल कौशल्यपुर्वक तपास करता त्याने पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय हद्दीमध्ये येलवाडी, सदुंबरे, इंदोरी, तळेगाव दाभाडे, मोशी, चिखली परिसरात घरफोडी केल्या असल्याचे सांगुन चोरी करताना रस्त्यालगत असणारे बंगल्याची रेकी करुन बंगले लॉक असताना व त्यातील लाईट बंद असल्यास बंगल्याचे पाठीमागील खिडकीचे गज कापुन आत मध्ये प्रवेश करुन बंगल्यात चोरी करत असल्याची कबुली देवुन खालील नमुद गुन्हे केल्याचे मान्य केले आहे.

अटक आरोपींचे नाव : –
१) आमिर शब्बीर शेख, वय २५ वर्षे, रा. सध्याचा पत्ता सेक्टर २५, निगडी प्राधिकरण, ता. हवेली जि. पुणे मुळगाव- वडेश्वर काटे, वडगाव मावळ, पुणे
२) सोहेल शफीक पठाण, वय २३ वर्षे, रा. खंडोबा मंदिर पायथा, निमगाव, ता. खेड जि. पुणे यांना अटक करण्यात आली आहे.
गुन्हयात एकुण जप्त मुद्देमाल ४५,३३,४००/- रुपये किंमतीचे १ किलो ७ तोळे २ ग्रॅम सोने, रोख रक्कम, व गुन्हयात वापरलेली मोटार सायकल सदरची कारवाई मा. पोलीस आयुक्त श्री विनयकुमार चौबे, मा. सह पोलीस आयुक्त श्री. संजय शिंदे मा. अपर पोलीस आयुक्त श्री. वसंत परदेशी, मा. पोलीस उप-आयुक्त श्री संदिप डोईफोडे, सहाय्यक पोलीस आयुक्त श्री. राजेंद्रसिंग गौर यांचे सुचना व मार्गदर्शना खाली वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्री. वसंतराव बाबर, पोलीस निरीक्षक गुन्हे संतोष कसबे, पोलीस उप निरीक्षक विलास गोसावी, प्रदिप गायकवाड, दिनेश चव्हाण पोहवा राजू कोणकेरी, अमोल बोराटे, युवराज बिराजदार, संतोष होळकर, विठ्ठल वडेकर, राजु जाधव पोना संतोष काळे, किशोर सांगळे, पोकॉ/ शिवाजी लोखंडे, बाळकृष्ण पाटोळे, राजेंद्र खेडकर, संतोष वायकर, गणेश गायकवाड, राहुल मिसाळ, अमोल माटे यांनी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!