राष्ट्रीय भ्रष्टाचार अत्याचार निवारण संघटना पुणे जिल्हा यांच्याकडून भोसरी येथे समाजासाठी अहोरात्र सेवा देणाऱ्या समाजसेवकांचा व पत्रकारांचा सन्मान सोहळा संपन्न व पद नियुक्ती बहाल..

प्रतिनिधी राष्ट्रीय भ्रष्टाचार अत्याचार निवारण संघटना पुणे जिल्हा यांच्याकडून समाजातील थोर व्यक्ती व कोरोना काळात ज्या डॉक्टरांनी निस्वार्थ सेवा दिली तसेच सामाजिक कार्य करणाऱ्या विशेष व्यक्तींना व पत्रकारांना ही सन्मानचिन्ह देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले याचबरोबर संघटनेच्या कर्तुत्वान सदस्यांना वरिष्ठ पदे देण्यात आली.
राष्ट्रीय भ्रष्टाचार अत्याचार निवारण संघटना महाराष्ट्र व देशात कशी पोहोचवता येईल यावर सर्व उपस्थित सदस्यांना अध्यक्ष श्री शुक्लाजी यांनी मार्गदर्शन केले श्री शुक्लाजी हे या संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत यांची उपस्थिती ही प्रमुख होती तसेच या कार्यक्रमासाठी राजकीय क्षेत्रातील नेतेमंडळी उपस्थित होते
या कार्यक्रमाच्या वेळी उपस्थित सर्व पत्रकारांचे सन्मानचिन्ह देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पुणे जिल्हाध्यक्ष मनोज कुमार चौधरी, तसेच एसव्ही बडे, अशोक ढोकळे, डी एस गरुड, किशोर देवकर, सौ. कल्याणी मेमाने, प्रतीक ठाकूर दामोदर गायकवाड, संभाजी राठोड, महबूब शहा, आकाश पारीख, अनिलकुमार पांडे, संतोष बागडे, अमित शुक्ला मुस्कान, या सर्वांनी कार्यक्रमाचे आयोजन केले. होते हा कार्यक्रम फार थाटामाटात व भव्य दिव्य पार पडला.



