विशेषशहरसामाजिक

गोवा येथील एका २९ वर्षीय महिलेने केली निगडी पोलिस चौकीत गळफास घेऊन आत्महत्या..

प्रतिनिधी-पिंपरी चिंचवड :- गोवा येथील एका २९ वर्षीय महिलेने पोलिस चौकीत गळफास घेऊन आत्महत्या
केल्याचा प्रकार उघडकीस आला. पिंपरी-चिंचवड
पोलिस आयुक्तालयांतर्गत निगडी पोलिस ठाण्याच्या ओटास्किम चौकीत सोमवार दि. १७/४/२०२३ दुपारी चारच्या सुमारास ही घटना घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निगडी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील १४ वर्षीय मुलगी गोवा येथे तिच्या नातेवाईकांकडे गेली होती. त्यावेळी गोवा येथे एका २९ वर्षीय महिलेशी अल्पवयीन मुलीची ओळख झाली, त्यानंतर मुलगी निगडी येथे परत आली.
त्यानंतर गोवा येथील ती महिला निगडी येथे येऊन अल्पवयीन मुलीला घेऊन गेली. मात्र याबाबत अल्पवयीन मुलीच्या घरच्यांना कोणतीही माहिती नव्हती. त्यामुळे मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार त्यांनी केली. निगडी पोलिस ठाण्यात १२ एप्रिल २०२३ रोजी अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, एक अल्पवयीन मुलगी एका महिलेसोबत असून त्यांचा वावर संशयास्पद आहे, अशी माहिती अहमदनगर येथील चाईल्ड हेल्पलाइनला मिळाली. त्यानुसार अहमदनगर पोलिसांनी मुलीकडे चौकशी करून तिच्या वडिलांशी संपर्क केला असता मुलीचे वडील आणि निगडी पोलिस अहमदनगर येथे पोहचून अल्पवयीन मुलीला व महिलेला ताब्यात घेऊन निगडी पोलिस ठाण्यात आणले. अल्पवयीन मुलगी व तिच्या आईवडिलांचा जबाब
नोंदवून घेण्यासाठी ओटास्किम पोलिस चौकीत नेण्यात आले. जबाब नोंदणीचे कामकाज सुरू असताना २९ वर्षीय महिला चौकीतील स्वच्छतागृहात गेली मात्र, स्वच्छतागृहातून लवकर बाहेर न आल्याने पोलिसांनी तिला बराच वेळ आवाज दिला पण तिचा प्रतिसाद न आल्याने स्वच्छता गृहाचा दरवाजा तोडला. महिलेने स्वच्छतागृहातील लोखंडी ॲंगलला स्वेटरच्या साह्याने गळफास घेतल्याचे दिसून आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!