देश-विदेशशैक्षणिकसंपादकीयसामाजिक

23 एप्रिल ! जागतिक पुस्तकदिन !! 35 हजारांहून अधिक पुस्तकांसाठी ‘राजग्रुह’ उभारणारे प्रज्ञासूर्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर..

प्रतिनिधी- 23 एप्रिल ! जागतिक पुस्तकदिन !! 35 हजारांहून अधिक पुस्तकांसाठी ‘राजग्रुह’ उभारणारे प्रज्ञासूर्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, “जर तुमच्याकडे दोन रुपये असतील तर एक रुपयाची रोटी घ्या आणि एक रुपयाचे पुस्तक घ्या. रोटी तुम्हाला जगण्यास मदत करेल तर पुस्तक तुम्हाला जगावे कसे ते शिकवेल.” हा क्रांतिकारी संदेश देणा-या आणि “आजन्म विद्यार्थी” राहिलेल्या बाबासाहेबांचे जग आज मनोभावे स्मरण करीत आहेत.

ज्ञानसूर्याच्या ग्रंथसंपदेवर एक नजर..
“कास्ट्स इन इंडिया” (१९१७),
“स्मॉल होल्डिंग इन इंडिया अँड देअर रेमीडिज” (१९१८),
“द प्रॉब्लम ऑफ द रूपी” (१९२३),
“दि इव्हॉलुशन ऑफ द प्रव्हिन्शिअल फाइनॅन्स इन ब्रिटिश इंडिया” (१९२४),
“वेटिंग फॉर अ व्हिझा” (१९३५-३६),
“इनहेलिशन ऑफ कास्ट” (१९३६),
“मिस्टर गांधी ॲंड दी इमॅन्सीपेशन ऑफ दी अनटचेबल्स” (१९४५),
“रानडे, गांधी ॲंड जिन्ना” (१९४३),
।थॉट्स ऑन पाकिस्तान” (१९४५),
“व्हाट कॉंग्रेस ॲंड गांधी हॅव्ह डन टू दि अनटचेबल्स” (१९४५),
“महाराष्ट्र एज ए लिंग्विस्टिक स्टेट” (१९४५),
“हू वेअर दि शुद्राज?” (१९४६),
“स्टेट्स ॲंड माइनॉरिटीज” (१९४७),
“हिस्ट्री ऑफ इंडियन करंसी ॲंड बॅंकिंग” (१९४७),
“द अनटचेबल्स: हू वेअर दे ॲंड व्हाय दे बिकम अनटचेबल्स” (१९४८),
“थॉट्स ऑन लिंग्विस्टिक स्टेट” (१९५५),
“बुद्ध ॲंड कार्ल मार्क्स” (१९४६),
“कम्युनल डेडलाक ॲंड वे टू सॉल्व इट” (१९४५),
“बुद्ध ॲंड दी फ्युचर ऑफ हिज रिलीजन” (१९५०),
“फ्युचर ऑफ पार्लियामेन्ट्री डेमोक्रैसी” (१९५१),
“लिंग्विस्टिक स्टेट्स नीड्स फार चेक्स ॲंड बॅलेन्सेज” (१९५३),
“बुद्धिज्म ॲंड कम्यूनिज्म” (१९५६),
“द बुद्धा ॲंड हिज धम्मा” (१९५७),
“हिंदू वुमन: राइजिंग ॲंड फॉल”
तर ही झाली बाबासाहेबांची ग्रथसंपदा ! राइटिंग्ज अँड स्पिचेस वेगळे !! जगाच्या पाठीवर जे socio-political leaders होऊन गेले ते या ज्ञानभांडाराच्या पासंगालाही पुरत नाहीत !विशेष म्हणजे केवळ लेखन एवढेच बाबासाहेबांना काम नव्हते; तर एकाचवेळी अध्ययन, सामाजिक लढे,सभा-परिषदा आणि भारताचे संविधानही त्यांना लिहायचे होते !!
जागतिक पुस्तक दिना निमित्त विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या लिखाणाचे स्मरण करत प्रा.बी.बी.शिंदे यांनी सर्व भारतीयांना जागतिक पुस्तक दिना निमित्त शुभेच्छा दिल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!