महाराष्ट्रशैक्षणिक
30 एप्रिलला होणाऱ्या एमपीएससीच्या परीक्षेचं 90,000 हॉल तिकीट व्हायरल…
संयुक्त पूर्व परीक्षा गट ब, आणि क च्या परीक्षेची ९०००० हॉल तिकीट व्हायरल टेलिग्रामवर 1 लाखापेक्षा जास्त हॉल तिकिट अपलोड करण्यात आल्याने लाखो विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झालाय…एमपीएससीची
वेबसाईट हॅक झाल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केलाय.
पण MPSC Exam 30 एप्रिलला होणाऱ्या परीक्षेचा डाटा लीक झाल्याच्या तक्रारीनंतर MPSC ने स्पष्टीकरण दिलं. काहीच हाॅल टिकीट वायरल झालेत सर्व डेटा वायरल झाला नाही व परिक्षा ३०तारखेलाच होईल महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची संयुक्त पूर्व परीक्षा येत्या ३० एप्रिलला होणार आहे. परीक्षेला अगदी एक आठवडा राहिलेला असतानाच या परीक्षेचे प्रवेशपत्र अर्थात हॉल तिकीट टेलिग्रामवर लीक झाल्याचं आढळून आलं आहे. त्यामुळे आता आयोगाने सायबर पोलिसांत तक्रार केली आहे