कलामहाराष्ट्रविशेषशहरसामाजिक

शिंदेशाहीतला एक तारा हरपला, आनंद शिंदें यांच्या पुतण्याचं निधन..

प्रतिनिधी मनोरंजन विश्वातल्या शिंदेशाहीतला एक तारा हरपला, गायक प्रल्हाद शिंदे आणि त्यांच्या कुटुंबियांनी आपल्या आवाजाने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केलं. शिंदे कुटुंबातील गायकांनी गायलेली गाणी कायमच प्रेक्षकांच्या लक्षात राहणारी आहेत. शिंदे कुटुंबियांवर आता दुःखाचा डोंगर कोसळला आहे. गायक आणि अभिनेता उत्कर्ष शिंदेने नुकतंच सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत याबद्दलची माहिती दिली आहे.
प्रल्हाद शिंदे यांचा नातू आणि आनंद शिंदे यांचा पुतण्या सार्थक शिंदे याचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं आहे. ३१ जुलै रोजी त्याने अखेरचा श्वास घेतला. सार्थक शिंदे हा दिनकर शिंदे यांचा मुलगा होता. उत्कर्षने सार्थकसाठी एक पोस्ट शेअर केली होती.
“तुझ्यासारखा कलाकार होणे नाही. आम्हाला तुझी कायम आठवण येत राहिल”, असे उत्कर्षने या पोस्टमध्ये म्हटले आहे. सार्थकच्या निधनानं शिंदेशाहीतला एक तारा हरपला, अशी भावना चाहत्यांकडून व्यक्त होत आहेत.
सार्थक हा भीम गीतांच्या कार्यक्रमांसाठी लोकप्रिय होता. तसेच तो उत्तम तबला आणि ढोलवादक ही होता. त्याने संपूर्ण महाराष्ट्राभर गाण्याचे कार्यक्रम केले होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!