आंदोलनमहाराष्ट्रमूंबईविशेषशहरसामाजिक

भूमिपुत्रांच्या अस्तित्वाची ही लढाई आहे…!

प्रतिनिधी सतिश पाटील मुंबई दि. १३ऑगस्ट २०२६ आज महाराष्ट्राच्या प्रत्येक कोपऱ्यात स्थानिक भूमिपुत्र बांधव वेगवेगळ्या प्रश्नांमुळे होरपळून निघत आहेत. वाढवण बंदर असो, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नामकरणाचा प्रश्न असो, भिवंडी असो किंवा ठाणे… मनात एकच प्रश्न निर्माण होतो.
“आपण आपल्या महाराष्ट्रातच आहोत ना… की आपल्या हक्कांसाठी दुसऱ्या राज्यात गेल्यासारखी लढाई लढावी लागत आहे?”
स्वतःच्या राज्यात, आपल्या पूर्वजांनी कष्टाने मिळवलेल्या स्वतःच्या मालकीच्या जागेत, स्वतःच्या पैशाने स्वतःचे घर बांधण्याचा अधिकारही जर प्रश्नांकित होत असेल, तर यापेक्षा मोठे दुर्दैव काय असू शकते?
आज मीरा-भाईंदरमधील राई, मोरवा आणि मुर्धा गावातील ग्रामस्थांनी पक्षीय राजकारण, मतभेद आणि वैयक्तिक भूमिका बाजूला ठेवून एका भूमिपुत्र बांधवाच्या घरावर होणारी कारवाई थांबवण्यासाठी एकजुटीने उभे राहणे, ही निश्चितच अभिमानाची आणि आशादायी बाब आहे.
काल गतहारी अमावस्या सण असूनही, आपला सण-उत्सव बाजूला ठेवून गावातील बांधव पूर्ण दिवस एकमेकांच्या पाठीशी उभे राहिले.
ही केवळ एका घराची लढाई नाही…
ही आपल्या मातीची, आपल्या अस्तित्वाची आणि आपल्या पुढच्या पिढीच्या भवितव्याची लढाई आहे.
मतभेद असतील, पक्ष वेगळे असतील, विचार वेगळे असतील…
पण भूमिपुत्रांच्या हक्काच्या प्रश्नावर आपण एकत्र आलो, तरच आपला आवाज बुलंद होईल.
आजची ही एकजूट अशीच कायम राहू द्या.
गाव एकजूट राहिले, समाज एकजूट राहिला तर कोणतीही मोठी लढाई आपण शांततेच्या आणि कायदेशीर मार्गाने लढू शकतो.
परप्रांतीय लोंढे सरकार थांबवू शकत नाही ते इतर राज्यातून येऊन महाराष्ट्र व मुंबई स्थानिक कसे होतात कोणाचा वरदहस्त मिळतो? त्यांना घरे कशी अधिकृत मिळतात? हा दुजाभाव का सरकार करीत आहे?
एकजूट भूमिपुत्र — मजबूत भूमिपुत्र!
आपली माती, आपला हक्क, आपला आवाज!
अध्यक्ष आगरी समाज एकता मंडळ मीरा भाईंदर

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button