
प्रतिनिधी- पिंपरी चिंचवड- क्रांतिसूर्य, राष्ट्रनायक, महात्मा जोतीराव फुले यांच्या 196 व्या जयंती उत्सव, आणि बहुजनांचे महानायक, बोधिसत्व, विश्वरत्न, भारतीय संविधानाचे शिल्पकार, प. पू. डॉ. बाबासाहेब भीमराव आंबेडकर यांची 132 वा जयंती उत्सव आज दिनांक 30 एप्रिल 2023 रोजी, शांतीनगर, भोसरी पुणे 26 येथे राष्ट्रीय दलित पँथर सेना व ठोके युवा मंच यांचे विद्यमाने संपन्न झाला. यात सूरूवात सर्व हारा उत्कर्ष चिंतन समाज सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. बी. बी. शिंदे व मूकनायकचे वरिष्ठ पत्रकार लक्ष्मण रोकडे यांचे हस्ते शिव, फूले, शाहू, आंबेडकर, व आण्णाभाऊंच्या प्रतिमेस पूष्पहार अर्पण करून झाली. गीत गायन व सन्मान सोहळा असा कार्यक्रम होता.
यावेळी “मूकनायक” चे प्रमुख वरिष्ठ पत्रकार व अनुवाद आपला न्यूज पोर्टलचे संपादक लक्ष्मण रोकडे यांचा सत्कार करताना टिपलेले छाया चित्र, यामध्ये उजवी कडून, हातात बाबासाहेब आंबेडकर लिखीत जातीय व्यवस्था निर्मूलन हे पुस्तक घेतलेले आयू. लक्ष्मण रोकडे दिसत आहेत, सोबत करूणा धनंजय मुंडे मॅम, संयोजक ठोके साहेब, मा. युवराज भास्कर आणि पत्रकार शफिक शेख व इतर प्रमुख पदाधिकारी दिसत आहेत. हा अविस्मरणीय क्षण सर्व हारा उत्कर्ष चिंतन समाज, सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. बी.बी. शिंदे सरांनी मोबाईल द्वारे टिपला.



