फुगेवाडी व हडपसर येथे गावठी दारू पिल्याने १५ जणांचा मृत्यू; अवैध मिथेनॉल पुरवठ्याकडे एफडीएचे दुर्लक्ष, एकाला अटक….

प्रतिनिधी पिंपरी चिंचवड दि. २९ मे २०२६ पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील विषारी दारू मृत्यूप्रकरणामागे अवैध ‘मिथेनॉल’चे कनेक्शन उघड झाले असून, एफडीए (FDA) विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे हा अनर्थ घडल्याचे समोर आले आहे. मिथेनॉल पुरवठ्यावर कोणतेही नियंत्रण नसल्याने १५ जणांना जीव गमवावा लागला. दरम्यान, उत्पादन शुल्क विभागाने तत्परता दाखवत मुख्य सूत्रधार योगेश वानखेडेला अटक केली, ज्यामुळे पुढील जीवितहानी टळली आहे. विभागाने वानखेडेच्या सर्व पुरवठा केंद्रांवर छापे टाकून इतर आरोपींनाही पोलिसांच्या हवाली केले आहे. या घटनेमागे मोठे रॅकेट असण्याची शक्यता असून, पोलीस अधिक तपास करत आहेत.
पिंपरी-चिंचवड शहरातील फुगेवाडी परिसरात ४८ तासांत तब्बल १५ जणांचा गूढ मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. गुरुवारी (दि. २८) दिवसभरात पाच जणांचा मृत्यू झाला होता, तर आज, शुक्रवारी आणखी सात जणांनी आपला जीव गमावला आहे. एकाच परिसरात लागोपाठ झालेल्या या मृत्यूंमुळे संपूर्ण पिंपरी-चिंचवड शहरात एकच खळबळ उडाली आहे.
हे मृत्यू विषारी दारूमुळे झाल्याची जोरदार चर्चा असली तरी एक गंभीर बाब समोर आली आहे ते म्हणजे मिथेनॉल’ चा होणारा अवैध काळाबाजार. हातभट्टी वरील दारू मधे मिथेनॉल’ मिसळणारे एक रँकेट पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात कार्यरत असल्याचे उत्पादन शुल्क विभागाच्या तपासात उघडकीस आले आहे.
उत्पादन शुल्क अधिक्षक अतुल कानडे यांनी तपासाबाबत सुचना देऊन पथके रवाना केली. चौकशी दरम्यान वानखेडे याने ज्यांना माल विकला त्या सगळ्यांची नावे उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकार्यांना दिली होती.
आकाश जाधव सह इतर आरोपींना उत्पादन शुल्क विभागाने तात्काळ ताब्यात घेऊन कारवाई केली, त्यामुळे पुढील मृत्यूच्या घटना रोखता आल्या.
पुण्यातील विषारी दारू प्रकरणी मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया…
विषारी दारू पिल्यानं १५ जणांचा मृत्यू ही एक प्रकारे हत्या आहे. पुणे आयुक्तांशी माझं बोलण झालं आहे. मी कडक कारवाईचे आदेश दिले आहेत. विषारी दारू बनवणाऱ्यांचा शोध लागला असून काही जणांचा शोध सुरू आहे. आतापर्यंत ८ जणांना अटक करण्यात आली आहे. दारूत मिथेनाॅल सारखा विषारी पदार्थ असल्याचे देखील मूख्यमंत्र्यांनी सांगितले आहे.
नागरिकांमध्ये विषारी दारूची चर्चा
नागरिकांमध्ये विषारी दारूची चर्चा असून या सर्व मृत्यूंचे नेमके कारण अद्याप अधिकृतपणे समोर आलेले नाही. मात्र, स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत पावलेल्या सर्व व्यक्तींनी एकाच भागातून दारू प्राशन केली होती. त्यामुळे हा सर्व प्रकार विषारी दारू प्यायल्याने घडला असावा, असा दाट संशय व्यक्त केला जात आहे. या घटनेमुळे आणखी दोघांची प्रकृती अत्यंत चिंताजनक असून, त्यांच्यावर जवळच्या रुग्णालयात अतिदक्षता विभागात (ICU) उपचार सुरू आहेत.
पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले असून अहवाल आल्यानंतरच कारण स्पष्ट होईल, असे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. पोलिसांच्या दिरंगाईमुळे स्थानिक नागरिकांनी मृतांच्या नातेवाईकांनी तीव्र संताप व्यक्त करत प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. परिसरात शोककळा आणि तणाव आहे. दोन दिवसांत १५ जणांचा बळी गेल्याने फुगेवाडी व हडपसर परिसरात अत्यंत क्लेशदायक चित्र आहे. घटनेचे गांभीर्य ओळखून वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी फुगेवाडी व हडपसर परिसरात धाव घेतली असून, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
अवैध मिथेनॉलचे कनेक्शन उघड; योगेश वानखेडेला अटक…
दरम्यान, विषारी दारूमुळे मृत्यू प्रकरणांमध्ये उत्पादन शुल्क विभागाने चौकशीसाठी योगेश वानखेडे याला दापोडी पोलीस स्थानकात आणलं होते. मृत्यूच्या घटनेनंतर वानखेडे पोलिसांत हजर होऊन त्यानेच पिंपरी चिंचवड, पुण्यात स्पिरिट पोहोचवल्याची कबुली दिली. ज्यानंतर पोलिसांनी त्याला अटक करून या प्रकरणात चौकशीची सूत्रं वेगाने फिरवायला सुरुवात केली असून ज्या कॅनमधून दारू पुरवल्याचा संशय आहे ते कॅन ताब्यात घेण्यात आले आहेत. या प्रकरणातील मुख्य आरोपी योगेश वानखेडे हा सराईत अवैध दारू विक्रेता असल्याची माहिती समोर आली आहे. त्याच्यावर यापूर्वीही अनेक गुन्हे दाखल असल्याचे समोर आले आहे.
हडपसरच्या पांढरे मळ्यात दोघांचा मृत्यू…
दुसरीकडे पुण्याजवळील हडपसरच्या पांढरे मळ्यात दोघांचा विषारी दारू पिऊन मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. पोटात मळमळ झाल्याने दोघांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती असून, दापोडीत आठ जणांचा विषारी दारू पिऊन मृत्यू झाल्यानंतर पुण्यात दोघेजण मृत्यू झाल्याची ही माहिती अनेक प्रश्नांना वाव देऊन जात आहे. हे दोघे मृत व्यक्ती पुण्यातील हडपसरच्या पांढरे मळ्यातील रहिवासी असल्याची माहिती आहे.
राष्ट्रवादी काॅंग्रेस शरद पवार गटाचे रोहित पवार यांचेवतीने येथे जावून आंदोलन करण्यात आले यावेळी त्यांनी पोलिसांवर आरोप करत इथली व्यवस्था बिघडली आहे ती लवकरात लवकर सूधारावी व सोबत प्रत्येक मृताचे नातेवाईकास सरकारने कमीतकमी दहालाख रूपये मदत करावी असे ही सांगीतले. यावेळी त्यांच्या कार्यकर्त्यांनी संबधीत दारू विक्रीचे शेड तोडत सरकारचा निषेध केला.



