विशेषशहरसामाजिक

कै. प्रविण काशिनाथ खिलारे व सिताराम धोंडू रहाटे ह्यांचे नाव सद्गुरू दत्त उद्यान येथील इमारत बांधकाम ठिकाणी देण्यात यावे.

प्रतिनिधी- पिंपरी-चिंचवड सदगूरू दत्त उद्यान येथील इमारत मध्ये कै. प्रविण काशिनाथ खिलारे व सिताराम धोंडू रहाटे ह्यांचे नाव देण्यात यावे म्हणून पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त ह्यांना निवेदन देण्यात आले निगडी यमुनानगर स्कीम नंबर 21 ह्या ठिकाणी सदगूरू दत्त उद्यान असून त्या ठिकाणी उद्यान मध्ये दुमजली इमारत बांधकाम संपूर्ण झाले असून त्या संदर्भात जेष्ठ नागरिक विरंगुळा केंद्र सुरू करण्यात येणार असून जेष्ठ नागरिक विरंगुळा केंद्र नामांतर मान्यता दिनांक १८/११/२०२१ रोजी कै प्रविण काशिनाथ खिलारे व सिताराम धोंडू रहाटे ह्यांचे नाव जेष्ठ नागरिक विरंगुळा केंद्र म्हणून मान्यता जनरल बॉडी सभेमध्ये पिंपरी चिंचवड महानगरपालिका भवन ह्या ठिकाणी देण्यात आली सभा ठराव क्रमांक ७३४ असून तो सदगूरू दत्त उद्यान इमारत मध्ये जेष्ठ नागरिक विरंगुळा केंद्र नामांतर विषय मंजूर करण्यात आला होता. पुन्हा नगरसेविका सुमन पवळे ह्यांनी दिनांक २४/१२/२०२१ रोजी सदगूरू दत्त उद्यान येथील इमारती मध्ये माता जिजाऊ जेष्ठ नागरिक विरंगुळा केंद्र नामांतर विषय मंजूर करून घेतला. त्यामुळे यमुनानगर येथील नागरिकांना विनाकारण दोन वर्षे विरंगुळा केंद्र सुरू होण्यासाठी प्रतिक्षा करावी लागली. नागरिकांना वैठीस धरुन विकासकामे बंद पाडण्यात येत आहे. सदगूरू दत्त उद्यान ह्या ठिकाणी यमुनानगर भागातील दिड ते दोन हजार नागरिक रोज सकाळी संध्याकाळी येत असून जेष्ठ नागरिकांना व्यायाम करण्यासाठी तसेच शतपावली करण्यासाठी महिला वर्ग शालेय विद्यार्थी जेष्ठ नागरिक ह्यांना सुविधा उपलब्ध व्हावी तसेच सदगूरू दत्त उद्यान ह्या ठिकाणी ओपन जिम सुविधा उपलब्ध व्हावी म्हणून मागणी करण्यात आली असून फक्त विरोधात काम करुन नागरिकांना वैठीस धरणे चुकीचे असून लवकरात लवकर सदगूरू दत्त उद्यान येथील इमारतीस कै. प्रविण काशिनाथ खिलारे व सिताराम धोंडू रहाटे ह्यांचे नावाने जेष्ठ नागरिक विरंगुळा केंद्र सुरू करण्यात यावे म्हणून मागणी करण्यात आली आहे. असे सचिन काळभोर सामाजिक कार्यकर्ते पिंपरी चिंचवड शहर यांनी सांगीतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!