देश-विदेशमहाराष्ट्रराजकीय

ब्रेकिंग न्यूज.. पवारांनी आज दोन पद्धतीनं राजकारणातून दूर जाण्याचे संकेत दिले..

प्रतिनिधी- राज्यसभेची टर्म 3 वर्षे उरलीय. या तीन वर्षात राज्याच्या आणि देशाच्या प्रश्नात अधिक लक्ष घालण्यावर माझा भर राहणार. याशिवाय मी दुसरी कुठलीही अन्य जबाबदारी घेणार नाही.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षाचं अध्यक्षपद सोडणार असल्याची घोषणा केली आहे. शरद पवारांनी त्यांचं आत्मचरित्र ‘लोक माझे सांगाती’ पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात बोलताना ही घोषणा केली. कुठे तरी थांबायचा विचार केला पाहिजे. मी तशी भूमिका घेणार नाही असं सांगत शरद पवार यांनी पक्षाच्या अध्यक्षपदावरुन निवृत्त होत असल्याची घोषणा केली आहे. पक्षाच्या वरिष्ठांनी नव्या अध्यक्षांसंबंधी निर्णय घ्यावा असंही शरद पवार यांनी सांगितलं आहे. दरम्यान शरद पवार यांनी निवृत्तीची घोषणा करताच सभागृहात कार्यकर्त्यांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. शरद पवारांनी निवृत्तीचा आपला निर्णय मागे घ्यावा अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!