आरोग्यमहाराष्ट्रविशेषसामाजिक

जखमी घारीला पक्षी मित्र कृष्णा निकम यांच्याकडून जीवदान..

प्रतिनिधी पिंपरी: दि.९ मे. वैशाली नगर येथील गरीब नवाज खानावळ या ठिकाणी दि.६ मे रोजी दुपारच्या वेळेस जखमी अवस्थेत एक घार पक्षी मित्र कृष्णा निकम यांना आढळून आली. त्यावेळी त्यांचे सोबत संदीप कापसे, यश कुहारे, बंटी गंगावणे, सुजल वारभुवन हे सहकारी ही उपस्थित होते. त्यांनी तात्काळ त्या घारीस उचलून जवळ घेतले व तिच्या वर उपचार सूरू केले. सध्या तिची अवस्था ठीकठाक आहे. पण ती आकाशात भरारी घेण्यास सक्षम नसल्याने तिचा सांभाळ करत आहेत. असे पक्षी मित्र कृष्णा निकम यांच्याकडून सांगण्यात आले. या वेळी ते बोलले की ती घार पूर्ण पणे ठीकठाक झाल्यास तिला पुन्हा निसर्गाच्या सानिध्यात सोडून दिले जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!