महापालिकेच्या वतीने माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू आणि क्रांतिवीर वस्ताद लहुजी साळवे यांची जयंती उत्साहात साजरी…

प्रतिनिधी पिंपरी-चिंचवड दि.१४ नोव्हेंबर २०२३ भारताचे पहिले पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरू यांनी पंधरा वर्षांहून अधिक काळ पंतप्रधान म्हणून भारताचे नेतृत्व केले, एक लोकशाहीवादी नेता अशी त्यांची ओळख होती तर आद्य क्रांतिकारक वस्ताद लहुजी साळवे हे स्वतः प्रखर देशभक्त तर होतेच शिवाय ते शस्त्रास्त्र विद्येचे प्रशिक्षक आणि सामाजिक समतेचे पुरस्कर्तेही होते, त्यांनी स्वातंत्र्यपूर्व काळात हजारों क्रांतिकारकाची फौज तयार करून इंग्रजांविरुद्ध मोठे आव्हान उभे केले होते असे प्रतिपादन अतिरिक्त उल्हास जगताप यांनी केले.
पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारती मधील पंडित जवाहलाल नेहरू यांच्या प्रतिमेस तसेच नेहरूनगर येथील त्यांच्या पुतळ्यास आणि क्रांतीगुरु वस्ताद लहुजी साळवे यांच्या प्रतिमेस अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते.
मुख्य प्रशासकीय इमारतीतील झालेल्या कार्यक्रमास विशेष अधिकारी किरण गायकवाड,जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक आणि सामाजिक कार्यकर्ते सुनील भिसे, नितीन घोलप, प्रल्हाद कांबळे, कर्मचारी महासंघाचे प्रतिनिधी बालाजी अय्यंगार उपस्थित होते तर नेहरूनगर येथील कार्यक्रमास माजी नगरसदस्य राहुल भोसले, क्षेत्रीय अधिकारी आण्णा बोदडे,सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने भारताचे पहिले पंतप्रधान भारतरत्न,पंडित जवाहरलाल नेहरू आणि थोर क्रांतिवीर वस्ताद लहुजी साळवे यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
चिंचवड स्टेशन येथे झालेल्या कार्यक्रमास क्रांतिवीर लहुजी वस्ताद साळवे आणि वासुदेव बळवंत फडके यांच्या पुतळ्यासही अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.


यावेळी आद्य क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे विचार प्रबोधन पर्वाचे अध्यक्ष संजय धुतडमल, माजी उपमहापौर तुषार हिंगे, माजी नगरसेवक काळूराम पवार, मारुती भापकर, माजी नगरसदस्या अनुराधा गोरखे, लोकशाहीर आण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष अमित गोरखे, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष आण्णासाहेब कसबे, भाऊसाहेब आडागळे, संदीपान झोंबाडे, मनोज तोरडमल, सतीश भवाळ, संजय ससाणे, हनुमंत कसबे,युवराज दाखले,अरुण जोगदंड, डी.पी.खंडाळे,आसाराम कसबे, मयूर जाधव, सुनील भिसे, प्रल्हाद कांबळे,विठ्ठल कळसे, शिवाजी साळवे, भानुदास साळवे, डॉ.धनंजय भिसे, अनिल गायकवाड, लहुजी वस्ताद साळवे महोत्सव महिला अध्यक्षा भारती चांदणे, सविता आव्हाड, केशरताई लांडगे, नितीन घोलप, विशाल कसबे, आण्णा कसबे, पांडुरंग लोखंडे आदी उपस्थित होते.
यावेळी अतिरिक्त आयुक्त जगताप यांनी युवकांना जास्तीत जास्त शिक्षण घेण्याचे आवाहन केले आणि जयंती तसेच दिवाळी निमित्त शहरवासियांना आयुक्त शेखर सिंह यांच्ता वतीने शुभेच्छाही दिल्या,तर आद्य क्रांतिगुरू वस्ताद लहुजी साळवे विचार प्रबोधन पर्वाचे अध्यक्ष संजय धुतडमल यांनी लहुमुद्रा देऊन सर्व मान्यवरांचे स्वागत केले.
आज ख्यातनाम शाहीर बापू पवार यांनी खास शैलीत आपली शाहिरी सादर केली.