
प्रतिनिधी-पिंपरी, दि. ७ मे २०२३ पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने सर्व क्षेत्रीय कार्यालयांमध्ये उद्या सोमवारी सकाळी १० ते १२ यावेळेत जनसंवाद सभा होणार आहे.
यात नागरिकांशी सुसंवाद साधणे, तक्रारींचे निराकरण करणे आणि प्रशासकीय निर्णयांमध्ये तसेच होणा-या विकासकामांमध्ये नागरिकांच्या आशा आकांक्षांचे प्रतिबिंब उमटावे यासाठी क्षेत्रिय कार्यालयनिहाय महिन्यातील दुस-या आणि चौथ्या सोमवारी जनसंवाद सभेचे आयोजन करण्यात येत आहे.
या सभेकरीता महानगरपालिकेच्या आठ क्षेत्रीय कार्यालयांसाठी क्षेत्रीय कार्यालयनिहाय मुख्य समन्वय अधिका-यांच्या नियुक्त्या केल्या आहेत. ते या जनसंवाद सभेचे अध्यक्षस्थान भूषवणार आहेत.




Atikarman vibhag antargat karyavahi sambhadhit.