महाराष्ट्रशहरसामाजिक

घरगुती गॅस सिलेंडर मधुन अवैधरित्या रीफलिंग करणाऱ्या इसमांना अटक गुन्हे शाखा युनिट २ ची कारवाई..

प्रतिनिधी- पिंपरी-चिंचवड ता. ०८/०५/२०२३
घरगुती गॅस सिलेंडर मधुन अवैधरित्या मानवी वस्त्यामध्ये लोकांचे जिवीतास धोका निर्माण होईल याची माहिती असताना सुध्दा कुठलीही खबरदारी न घेता गॅस रीफलिंग करणाऱ्या इसमांना अटक गुन्हे शाखा युनिट २ ची कारवाई मा. पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी पिंपरी-चिंचवड परीसरात अवैद्य धंदयावर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यांचे व मा. पोलीस उप आयुक्त गुन्हे श्रीमती स्वप्ना गोरे यांचे आदेशान्वये अवैद्य धंद्यावरती सतत कारवाया चालु आहेत.
पिंपरी-चिंचवड शहर हे एक औद्योगिक व शैक्षणिक दृष्टया अत्यंत महत्वाचे शहर असुन येथे विविध कंपन्या, शैक्षणिक संकुल असल्याने मोठ्या प्रमाणत मानवी वसाहत असनु राज्यातुन परराज्यातून लाखोचे संखेने कामगार वर्ग व विद्यार्थी मोठ्या प्रमाणत येत असतात. त्यांना लागणाऱ्या भौतिक गरजापैकी रोजच्या स्वयंपाकासाठी लागणारा गॅस तो सहज उपलब्ध होत नसल्याने याचा फायदा घेवुन काहि इसम पिंपरी -चिंचवड परीसरामध्ये घरगुती वापराचे सिलबंद गॅस सिलेंडर मधुन स्वत:चे आर्थिक फायद्यासाठी अवैधरित्या पाईप सर्किटचे सहाय्याने कोणतीही खबरदारी न घेता रिकाम्या ४ किलोच्या छोटया गॅस टाक्यांमध्ये बेकायदेशिरपणे गॅस रिफील करुन त्या टाक्या जादा दराने विकत असल्याची खात्रीशीर बातमी पोलीस नाईक १६०३ देवा राऊत व पोलीस हवालदार ८३२ जयवंत राऊत यांना मिळालेने सदरची माहिती वरीष्ठ अधिकारी व गुन्हे शाखा युनिट २ चे पोलीस निरीक्षक जितेंद्र कदम यांना कळविली असता त्यांनी कारवाई करणेबाबत आदेशित केल्याने, पोलीस निरीक्षक जितेंद्र कदम, पोलीस उप निरीक्षक गणेश माने व पोलीस अंमलदार जयवंत राऊत, संतोष इंगळे, देवा राऊत, सागर अवसरे यांचे पथकाने पदमजी पेपर मिल जवळ थेरगाव येथिल आर्या गॅस सव्र्व्हिस, सदाशिव कॉलनी, साने चाळ, या दुकानावर छापा मारला असता दोन इसम हे सिलबंद घरगुती गॅस सिलेंडर मधुन स्वत:चे आर्थिक फायद्यासाठी अवैधरित्या कोणतीही खबरदारी न घेता लोकांचे जिवीतास धोका निर्माण होईल हे माहित असुन सुध्दा मानवी जिवीतास पोहचणाऱ्या कोणत्याही संभाव्य धोक्यापासुन सुरक्षित राहण्यास पुरेसा इतका बंदोबस्त करणे गरजेचे असताना ज्वालाग्राही पदार्थाबाबत पुरेसा बंदोबस्त करण्याचे जाणीवपुर्वक टाळुन लोखंडी रिफील पाईप सर्किटच्या सहाय्याने दुसऱ्या रिकाम्या ४ कीलोच्या टाक्यांमध्ये गॅस रिफील करताना १) विष्णु ज्योतीराम सुतार वय २४ वर्षे रा. सदाशिव कॉलनी, साने चाळ, पदमजी पेपर मिल जवळ थेरगाव, पुणे. मुळगाव- मु. पो. विजयनगर, हनुमान मंदिरा शेजारी, ता. देवणी जि. लातुर व दुसऱ्या इसमाने त्याचे नाव २) अतुल श्रीहरी पांचाळ वय २५ वर्षे रा. सदाशिव कॉलनी, साने चाळ, पदमजी पेपर मिल जवळ थेरगाव, पुणे. मु. पो. कोहळनुर ता. जळकोट जि. लातुर यांना रंगेहाथ पकडले. त्यांच्या ताब्यातुन ७८,७००/- रु किं चा एकुण मुद्देमाल त्यामध्ये २१ घरगुती वापराचे गॅस भरलेले विविध कंपनीचे सिलेंडर, ०१ घरगुती वापराचे रिकामे सिलेंडर, ०१ घरगुती वापराचे अर्धा गॅस काढलेली टाकी, ०१ व्यावसायीक वापराचे रिकामे सिलेंडर, ०५ लहान सिलेंडर, ०१ लहान पितळी रिफिलर, ०१ लोखंडी रिफील पाईप, एक इलेक्ट्रॉनिक वजन काटा, गॅस रीफिलिंग करीता वापरात येणारे एक गॅस रिफिलिंग सर्किट त्यास रबरी पाईप असलेले व दोन्ही बाजुस सिलेंडरला बसणारे पितळी व स्टिलचे कॉक व त्याचेवर लाल रंगाचे फिरवण्याचे बटण, ०२ लोखंडी ॲडजेस्टेबल पान्हे असे साहित्यसह मिळुन आले.
तसचे दुसऱ्या ठीकाणी सदाशिव कॉलनी, पदमजी पेपर मिल जवळ थेरगाव, पुणे या ठिकाणी याचप्रकारे एका रुममध्ये अवैधरित्या पाईप सर्किटचे सहाय्याने कोणतीही खबरदारी न घेता रिकाम्या ४ किलोच्या छोटया गॅस टाक्यांमध्ये बेकायदेशिरपणे गॅस रिफील करीत असल्याची माहिती मिळाल्याने तेथे छापा टाकुन इसम नामे जयराम सर्जेराव चौधरी वय २२ वर्षे रा. देवा मेटकरी यांची रुम लमाण तांडा नेहे दत्तवाडी ता. मुळशी जि. पुणे. मुळगाव- मु. कुंभारी, पो. वाघी बोबडे ता. जिंतुर जि. परभणी यास ताब्यात घेवून त्याच्या त्याच्यातुन ७१,५२५/- रु. किं चा एकुण मुद्देमाल त्यामध्ये ९ घरगुती वापराचे गॅस भरलेले असलेले सिलेंडर, ११ घरगुती वापराचे रिकामे विविध कंपनीचे सिलेडर, विविध कंपनीचे ०२ व्यावसायीक वापराचे रिकामे सिलेंडर, ११ भरलेले लहान सिलेंडर, १० रीकामे लहान सिलेंडर, ०२ पितळी रीफीलर नोजल, एक इलेक्ट्रॉनिक वजन काटा, ०१ लोखंडी ॲडजेस्टेबल पान्हा असे साहित्य जप्त करण्यात आले. सदरचे प्रकारे मानवी वस्त्यांमध्ये सुरु होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!