महाराष्ट्रशहरसामाजिक

चिखली,कुदळवाडी येथील नाल्यात अनधिकृत बांधकाम करणाऱ्या पर्यावरण विभागातील अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी..

प्रतिनिधी-पिंपरी-चिंचवड चिखली,कुदळवाडी येथील नालयात अनधिकृत बांधकाम करणाऱ्या पर्यावरण विभागातील अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी वंचित बहूजन आघाडीचे पुणे शहर उपाध्यक्ष राजकुमार परदेशी यांनी पिंपरी-चिंचवड आयुक्त शेखर सिंह यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.
‘चिखली कुदळवाडी येथील नाल्यात पर्यावरण यांत्रिकी विभागाने बांधकाम विभागाची कोणतीही परवानगी न घेता अनधिकृतपणे सांडपाणी प्रर्कीया प्रकल्पाचे काम
केले आहे. ते बांधकाम ताबडतोब पाडून पर्यावरण विभागातील संबंधित अधिकारी व अभियंत्यांवर कारवाई करा.
चिखली, कुदळवाडी येथील नाल्या शेजारी बांधकाम करताना नाल्याच्या प्रवाहास कोणताही अडथळा निर्माण होणार नाही असे पत्र पाटबंधारे विभागाने यांत्रिकी
पर्यावरण विभागाला दिले आहे. मात्र पर्यावरण विभागाने सांडपाणी प्रक्रीय प्रकल्प चक्क नाल्यात 29 ते 30 पीलर टाकून केले आहे. त्यामुळे पावसाळ्यात धोका निर्माण होवू शकतो. त्यामुळे हे बांधकाम त्वरित पाडून त्याचा झालेला खर्च विभागाचे सबंधित अधिकारी व अभियंते यांच्या कडून वसूल करावा व अशा अनधिकृत बांधकाम करणाऱ्या अधिकारी व अभियंत्यावर कारवाई करावी. आयुक्तांनी अशा दोषी अधिकारी व अभियंत्यांवर कारवाई न केल्यास आम्ही आपल्या विरोधात न्यायालयात दाद मागू असे वंचित बहूजन आघाडी पूणे शहराचे उपाध्यक्ष राजकुमार परदेशी यांनी सांगीतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!