अंकुश चौकातील कमानीला भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसाहत हे नाव द्यावे – कुतुबुद्दीन होबळे

प्रतिनिधी-पिंपरी, दि. 14 मे 2023 – सेक्टर नंबर 22 अंकुश चौक निगडी येथे एस.सी., एस.टी., व वो.बी.सी. समाज मोठ्या प्रमाणात आहे. संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्याप्रती असणारी येथील एस.सी., एस.टी., व वो.बी.सी. वर्गाची श्रद्धा व आत्मियता पाहता पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीतील सेक्टर नंबर 22 अंकुश चौक निगडी पुणे 44 येथील नवीन कमानीच्या प्रवेशद्वारावर यापूर्वी होते तेच नाव म्हणजेच “भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसाहत” हे नाव देण्यात यावे, अशी मागणी कुतूबुद्दीन आबू होबळे, सचिव ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (AIMIM) पिंपरी चिंचवड शहर यांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त श्री. शेखर सिंग यांना केली. तसेच सदर मागणीचे निवेदनही आयुक्त कार्यालय आणि ‘फ’ क्षेत्रीय अधिकारी, पिंपरी चिंचवड महानगर पालिका यांना देण्यात आले.
यावेळी अकील भाई मुजावर महासचिव AIMIM पक्ष महाराष्ट्र राज्य, हाफिज अबू बकर उप शहरअध्यक्ष ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (AIMIM), दिपक कांबळे उप शहर अध्यक्ष ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (AIMIM) तसेच असंख्य प्रमाणात नागरिक आणि कार्यकर्ते उपस्थित होते.



