देश-विदेशविशेषशहरसामाजिक

फिल्मी स्टाईलने पाठलाग करून पिंपरी-यूपी खाजगी प्रवासी वाहतूक क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी घेवून जाणारी आणखी एक बस पकडली..

प्रतिनिधी- पिंपरी-चिंचवड भारतीय जनता पार्टी कामगार आघाडी आणि शिव श्रमिक मजदुर संघटना यांनी खाजगी प्रवासी वाहतूकीच्या विरोधात उघडलेल्या मोहिमेअंतर्गत काल रात्री फिल्मी स्टाईलने पाठलाग करत तब्बल तिन तासाच्या परिश्रमानंतर परिवहन विभागाचे मदतीने मनोज कसबे व सहकार्‍यांनी बस क्र. UP75 M 8034 वर कार्यवाही करीत बसमालकाला क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी आणि मालवाहतूक केल्या बद्दल तब्बल एक लाख दोन हजार रुपये इतका दंड ठोठावला.
सदरची कार्यवाही उपपरिवहन अधिकारी श्री. अतुल आदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस अधिकारी अनुश्री केंद्रे आणि त्यांचे सहकारी यांनी कारवाई केली. यावेळी भारतीय जनता पार्टी कामगार आघाडी पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष श्री मनोजभाऊ कसबे शिव श्रमिक मजदुर संघटनेचे उपाध्यक्ष सतिश भांडेकर, सचिव गोपाल कसबे, परिवर्तन आघाडीचे नेते अमित मोहिते आणि सहकारी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!