महाराष्ट्रशहरसामाजिक

“क” क्षेत्रीय कार्यालय मार्फ़त अतिक्रमण पथकाची कारवाई

प्रतिनिधी-दिनांक – १८/०५/२०२३ पिंपरी चिंचवड महानगरपालिका क क्षेत्रीय कार्यालय, अतिक्रमण पथकाच्या मार्फ़त, गट क्र. ७७१ मधील कुदळवाडी- चिखली रोड, कुदळवाडी नायरा पेट्रोल पंपासमोरील
परिसरामधील सुमारे ४७५०० चौ. फुट वरील अनाधिकृत इंडस्ट्रीएल पत्राशेडवर अतिक्रमण निष्कासनाची आज कारवाई करण्यात आली.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे मा.आयुक्त शेखर सिंह, अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे, अतिरिक्त आयुक्त २ जितेंद्र वाघ, शहर अभियंता मकरंद निकम यांचे निर्देशानुसार व सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे, उप अभियंता सुर्यकांत मोहिते, यांच्या नेतृत्वाखाली कनिष्ठ अभियंता चंद्रकांत पाटिल, प्रसाद आल्हाट, प्रियंका म्हस्के, केतकी कुलकर्णी व स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक योगेश शेवलकर व मनपा कर्मचारी, महाराष्ट्र सुरक्षा बल, महाराष्ट्र पोलिस, यांच्या नियंत्रणाखाली सदर कारवाई करण्यात आली.
गट क्र.७७१ मधील कुदळवाडी – चिखली रोड, कुदळवाडी नायरा पेट्रोल पंपासमोरील परिसरामधील सुमारे ४७५०० चौ. फुट वरील ०६ इंडस्ट्रीएल पत्राशेड अतिक्रमण निष्कासनाची कारवाई करण्यात आली.
आज करण्यात आलेल्या या कारवाईत क क्षेत्रीय अतिक्रमण पथक, महाराष्ट्र सुरक्षा बल व महाराष्ट्र पोलीस पथक, अग्निशमन दल (चिखली), सहभागी झाले होते. दररोज शहराच्या विविध भागात अतिक्रमण कारवाई केली जात आहे.
नागरिकांनी रस्त्यावर अनधिकृत टपर्‍या व पत्राशेड उभारु नये. तसेच फ़ुटपाथ स्वच्छ ठेवण्यासाठी सहकार्य करावे, मा. आयुक्त यांच्या निर्देशनानुसार सदर कारवाई केलेल्या ठिकाणी मनपा परवानगी घेतल्याशिवाय अनधिकृत पत्राशेड / बांधकाम करु नये. अशा सुचना देण्यात आल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!