विशेषशैक्षणिकसामाजिक

सरकारी जमिनीवर अवैध उत्खणन दिड वर्षापासून होतेय डोळेझाक..राजू चांदणे

प्रतिनिधी- शिरूर पूणे- शासनाचे नुकसान होत असल्याचे दिसूनही अधिकारी मूक गिळून गप्प बसलेत.
राजू प्रल्हाद कांबळे व त्याचे कुटूंबिय यांनी बेकायदेशीर शिरूर पुणेच्या शासकीय जमिनीचे उत्खनन करुन शासनाचे नुकसान करीत असल्याचे वेळोवेळी सांगून देखील अधिकारी याकडे दुर्लक्ष करत आहे. या संदर्भात चंदननगर गावठाण येथील नवनाथ श्रीपती आडागळे यांनी लेखी पत्राद्वारे तहसिलदार, शिरुर जिल्हाधिकारी पुणे यांस व गटविकास अधिकारी शिरूर यांस स्वतः प्रत्यक्ष या घटनेची तक्रार देऊन उत्खनन ताबडतोब थांबवावे अशी विनंती केली. यावेळी राष्ट्रवादी काॅंग्रेस पिंपरी-चिंचवड शहर जिल्हा चिटणीस राजू चांदणे बोलले की दि. ०७/०९/२०२१ रोजी ही तक्रार अर्ज केला होता पण यावर लक्ष दिले नाही जवळपास दिड वर्ष सतत तक्रारी दिल्या आहेत. मात्र सारे काही अगदी “पालथ्या घड्यावर पाणी” पडते असे होतय. याबाबतचे तक्रारदार नवनाथ श्रीपती आडागळे, रा. चंदननगर गावठाण, मांडवगण फराटा, ता. शिरुर, जि. पुणे यांचा दिनांक ०७/०९/२०२१ रोजीचा तक्रार अर्ज तहसिलदार, शिरुर महाराष्ट्र शासन जिल्हाधिकारी पुणे या कार्यालयास प्राप्त झालेला आहे.
यावेळी तक्रार अर्जात राजू प्रल्हाद कांबळे व कुटूंबियांनी बेकायदेशीरपणे ग्रमापंचायत हद्दीतील शासकीय जागा बळकविण्यासाठी सदर जागेत श्री. नागवडे यांचा जे.सी.बी. व ट्रॅक्टर लावून बेकायदेशीरपणे उत्खनन करत असलेबाबत नमूद केलेले आहे. सदर तक्रार अर्जाची प्रत सोबत जोडली आहे. सदर तक्रारीच्या अनुषंगाने सविस्तर चौकशी करुन चौकशीअंती तथ्य आढळून आल्यास महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ मधील तरतुदीनुसार योग्य ती कारवाई करुन केलेल्या कार्यवाही बाबत अर्जदार यांना अवगत करून द्यावी. अन्यथा जिल्हाधिकार्यालय व येथिल रटाळ कार्यपद्धती विरोधात आंदोलन छेडले जाईल यावेळी नवनाथ आडागळे, बायडाबाई पवार, रामदास पवार, सूहास आडागळे उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!