चिखलीतील सोन्या तापकीर हत्याकांडातील आरोपींची नावे पोलिसांच्या हाती..

प्रतिनिधी-पिंपरी-चिंचवड (दि. २२ मे २०२३) :- चिखली गावातील चिखली प्रवेशद्वार कमानीसमोर दुचाकीवरून आलेल्या दोघांनी आज (दि. २२) रोजी दुपारी १:४५ च्या सुमारास गोळीबार करून एकाला ठार केले आणि पसार झाले. यात कृष्णा उर्फ सोन्या हरिभाऊ तापकीर (वय २० वर्षे रा. महादेव मंदीराजवळ, चिखलीगाव) असे हल्ल्यात ठार झालेल्या तरुणाचे नाव आहे.
दरम्यान मयताचा मित्र सौरभ उर्फ सोन्या पानसरे (रा. मु.पो. मोई, ता. खेड जिल्हा पुणे) व त्याचा साथिदार सिध्दार्थ कांबळे (पत्ता माहीत नाही) या दोघांनी अज्ञात कारणावरुन सोन्यावर गोळ्या झाडून त्याला गंभीर जखमी करून जिवे ठार मारले. असे पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर काटकर यांनी सांगीतले.
याबाबत चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम चालु असून आरोपीचा शोध घेण्यासाठी विविध पथके तयार करण्यात आल्याची माहिती चिखली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर काटकर यांनी दिली आहे.





