जालण्यात सूरू असलेल्या मराठा आंदोलना वेळी आंदोलकांनवर पोलिसांचा लाठीचार्ज व हवेत गोळीबार

प्रतिनिधी जालना दि. ०१ सप्टेंबर २०२३ जालन्यात मराठा आंदोलकांवर पोलिसांचा भीषण लाठीचार्ज, प्रचंड गदारोळ, चेतन पाटील मराठा समाजाकडून जालन्यातील एका गावात उपोषण सुरु होतं. या उपोषणादरम्यान पोलिसांनी लाठीचार्ज केला. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी या गावात संबंधित घटना घडली आहे. मराठा आंदोलकांवर लाठीचार्ज करण्यात आलाय. मराठा आंदोलकांचे आरक्षणासाठी आंदोलन सुरु होतं. आंदोलकांनी टाकलेल्या मंडपात पोलीस घुसले अशी माहिती मिळते आहे. यावेळी पोलिसांनी प्रचंड लाठीचार्ज केला. आंदोलकांकडून दगडफेक ही झाली आहे, असा आरोप पोलिसांचा आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी कार्यकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी काही सहकाऱ्यांसह उपोषण सुरु केलं होतं. गेल्या चार दिवसांपासून मनोज जरांगे यांचं उपोषण सुरु होतं. आरक्षण थेट जाहीर करावं, अशी त्यांची मागणी होती.
या दरम्यान मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती ढासळत चालली होती. त्यामुळे अनेकांनी त्यांना उपोषण मागे घेण्याची विनंती केली होती. पण ते उपोषणावर ठाम होते. या आंदोलनात अनेक गावकरी आणि संघटना सहभागी असल्याची माहीती मिळते. पण पोलिसांनी हे आंदोलन मोडून काढण्याचा प्रयत्न केला असे बोलले जाते. विशेष म्हणजे लाठीचार्ज पूर्वी मनोज जरांगे पाटील आणि गावकऱ्यांसोबत पोलिसांची चर्चा देखील झाली होती. आंदोलनस्थळी हजारोंचा जमाव जमलेला होता. यावेळी पोलीस आणि गावकरी यांच्यात बाचाबाची झाली. अशी माहिती मिळते आहे. त्यानंतर पोलिसांकडून जोरदार लाठीचार्ज करण्यात आला. यावेळी हवेत गोळीबार ही करण्यात आल्याचे आंदोनकर्ते सांगत होते.
सूप्रिया सूळे यावर काय बोलल्या..
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या आंदोलकांवर पोलीसांनी लाठीचार्ज केला. हे अतिशय संतापजनक आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या भुलथापा देऊन भाजपाने मते घेतली परंतु आरक्षणाच्या बाबतीत मराठा समाजाला केवळ आश्वासने देण्यापलीकडे भाजपाने काहीही केले नाही, ही वस्तुस्थिती आहे. मराठा, धनगर, लिंगायत आणि मुस्लिम समाजाला आरक्षण देण्याबाबत आमची भूमिका स्पष्ट आहे. परंतु भाजपाने यासंदर्भात सातत्याने संभ्रम वाढविणारी भूमिका घेतली. केंद्र आणि राज्यात एकाच पक्षाचे, विचारांचे सरकार असूनही आरक्षण दिले जात नाही हि खेदाची बाब आहे. मराठा समाजाच्या आंदोलनकर्त्यांवर लाठिहल्ला करुन भाजपा सरकारने समाजाची क्रूर फसवणूक केली आहे. भाजपाने मराठा समाजाची याबद्दल माफी मागितली पाहिजे. तसेच ग्रहमंत्र्यानी त्यांच्या पदाचाही राजीनामा द्यावा अशी मागणी राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या कार्याअध्यक्षा सूप्रिया सूळे यांनी केली सोबत या लाठीहल्ल्याचा निषेध ही केला आहे.
तसेच मराठा आंदोलनकर्त्यांनी उदया बीड बंदची हाक दिली असल्याची माहिती मिळते आहे.




