महाराष्ट्रविशेषशहरसामाजिक

मनोहर कुलकर्णी उर्फ संभाजी भिडे यांच्या सभेला परवानगी नाकारण्यात यावी अन्यथा सभा उधळून लावू..- रामभाऊ ठोके

प्रतिनिधी पूणे ३१ ऑगस्ट २०२३ मा. वरिष्ठ पोलीस निरिक्षक, लोणीकंद पोलीस ठाणे, पुणे शहर. यांना पँथर युवा मोर्चाच्या वतीने शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संघटनेचे मनोहर कुलकर्णी उर्फ संभाजी भिडे यांच्या ०२ सप्टेंबर २०२३ होणार्‍या सभेला परवानगी नाकारण्यात यावी.
खामगाव येथे भिडे यांची सभा नियोजित आहे. मात्र खामगाव शहरात कार्यक्रम झाल्यास कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. देशाला व समाजाला हानिकारक असणारे बेताल वक्तव्य करण्यासाठी मनोहर कुलकर्णी उर्फ संभाजी भिडे हे नेहमीच चर्चेत असतात. भीमा कोरेगावच्या संदर्भातील पूर्व नियोजित कटाचे ते एक मुख्य आरोपी आहेत. या जाहीर सभेतून खामगाव शहर व तालुक्यातील शांतता बिघडविण्याचे कृत्य घडू शकते. देशद्रोही वक्तव्य करून धार्मिक व सामाजिक तेढ निर्माण होऊ शकते त्यामुळे भिडे यांच्या सभेची परवानगी रद्द करावी. तथा शांतता व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी प्रयत्न करावे असे सुद्धा आवाहन या निवेदन अर्जाद्वारे करण्यात आले आहे.
मनोहर कुलकर्णी उर्फ संभाजी भिडे हे सतत महापुरुषांचा अवमान करून जातीय तेढ निर्माण करण्यासाठी तसेच वेगवेगळ्या अंधश्रद्धेच्या बाबी पसरवून लोकांचे मन पाखंडाकडे वळविण्याचे काम करत आहे.
महिलांचा अवमान करणे, मागील काही दिवसापूर्वी एका पत्रकार महिलेला टिकली वरून वादग्रस्त विधान करून शांतता भंग करण्याचे काम केले आहे. आणि तसेच देशाच्या तिरंगा (राष्ट्रध्वज) बाबत सुद्धा चूकिचे विधान करून देशाचा व तिरंग्याचा अवमान केला आहे. मनोहर कुलकर्णी उर्फ संभाजी भिडे हे सतत वाद वाढवत असतात. त्यामुळे मा. वरिष्ठ पोलीस निरिक्षकांनी त्यांचा पूर्वनियोजित कट ओळखून त्यांचेवर सदर गुन्हा दाखल करण्यात यावा, व सभेपासून दूर ठेवावे अन्यथा आम्ही तो कार्यक्रम उधळून लावू असा गांभीर्यपूर्वक इशारा देखील या निवेदन अर्जाद्वारे देण्यात आलेला आहे.
खामगाव शहरात सर्व जाती धर्माचे नागरिक सलोख्याने जीवन जगत आहेत. खामगाव शहर व परिसरातील शांतता व सलोख्याचे वातावरण या कार्यक्रमामुळे बिघडू शकते.
त्यामुळे या सर्व बाबींचा गांभिर्यपूर्वक विचार करून मनोहर कुलकर्णी उर्फ संभाजी भिडे यांच्या सभेला परवानगी देण्यात येऊ नये. असे अर्जाद्वारे पँथर युवा मोर्चाचे राष्ट्रिय अध्यक्ष रामभाऊ मोहन ठोके यांनी निवेदन दिल्याचे सांगीतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!