महाराष्ट्रविशेषशहरसामाजिक

‘संभाजी भिडे यांच्या सभेला लोणीकंद पोलीसांनी परवानगी नाकारली’! “पँथर युवा मोर्चाच्या वतीने आनंदोत्सव साजरा” – रामभाऊ ठोके

प्रतिनिधी पूणे ०२ सप्टेंबर २०२३ मा. वरिष्ठ पोलीस निरिक्षक, लोणीकंद पोलीस ठाणे, पुणे शहर यांना पँथर युवा मोर्चाच्या वतीने दोन दिवसांन पूर्वी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संघटनेचे मनोहर कुलकर्णी उर्फ संभाजी भिडे यांच्या ०२ सप्टेंबर २०२३ होणार्‍या सभेला परवानगी नाकारण्यात यावी. अन्यथा आम्ही तो कार्यक्रम उधळून लावू असा गांभीर्यपूर्वक इशारा देखील देण्यात आला होता. या विषयाचे निवेदन देण्यात आले होते.
या निवेदनाचा मा. वरिष्ठ पोलीस निरिक्षक, लोणीकंद यांनी गांभीर्यपूर्वक विचार करून घटनेचे गांभीर्य लक्षात घेवून खामगाव येथे भिडे यांच्या होणार्‍या सभेला परवानगी नाकारली आहे. त्या मूळे होणारी ही सभा आता होणार नाही असे आनंद उत्सव साजरा करताना पँथर युवा मोर्चाचे राष्ट्रिय अध्यक्ष रामभाऊ मोहन ठोके यांनी सांगीतले सोबत ते हे सांगायला विसरले नाही की अनुवाद आपला या न्यूज पोर्टलने ही बातमी दाखवली त्यांच्या बातमीचा यात सिंहाचा वाटा आहे. जेणे करून या सभेला परवानगी नाकारली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!