
विशेष प्रतिनिधी । दि . ३ जून । ओडिशामध्ये शुक्रवारी संध्याकाळी झालेल्या भीषण रेल्वे अपघातातील मृतांची संख्या आतापर्यंत २८८ वर पोहोचली आहे. तर सुमारे ८५० लोक जखमी झाले आहेत. या घटनेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः ओडिशात पोहचले आहेत. सकाळी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनीही घटनास्थळी पोहोचून परिस्थितीचा आढावा घेतला. अपघाताचे गांभीर्य लक्षात घेऊन बचावकार्य सूरू आहे. बचाव कार्यात लष्करही तैनात करण्यात आले होते.
या भीषण अपघाताची नैतिक जबाबदारी स्वीकारून रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी राजीनामा द्यावा, अशी विरोधी पक्षाचे वतीने मागणी होताना दिसते आहे
2016 मध्ये कानपूरमधील पुखरायनजवळ इंदूर-पाटणा एक्सप्रेस रुळावरून घसरली होती. या अपघातात 100 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता. यात रेल्वे मंत्र्यांनी नैतिक जवाबदारी समजून राजिनामे दिले नाहीत..पण “माजी पंतप्रधान लालबहाद्दूर शास्त्री यांनी त्यांच्या कार्यकाळात घडलेल्या एका लहान रेल्वे अपघाताची नैतिक जबाबदारी स्वीकारून ताबडतोब पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला होता.” भाजप नेत्यांमध्ये तेवढी नैतिकता आणि संवेदनशीलता आहे काय? असा प्रश्न विरोधकांनी भाजपला विचारला आहे. चौकशीअंती पूढे अशी ही माहिती भेटते आहे की शुक्रवारी ओडिशात झालेल्या भीषण अपघातात मृतांची आकडेवारी वाढण्याची शक्यता आहे.



