देश-विदेशमहाराष्ट्रराजकीयविशेषसामाजिक

३५०वा? शिवराज्याभिषेक साजरा करण्याचा विचार कोणाच्या सुपीक डोक्यातून बाहेर पडला.. जितेंद्र आव्हाड

प्रतिनिधी- काय दिवस आले आहेत महाराष्ट्रावर…? निवडणुकांसाठी वाट्टेल ते…..?
छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवराज्याभिषेक हा दिनांक 6 जून, 1674 रोजी झाला. इथे मात्र निवडणूकांचे गणित समोर मांडून राज्याभिषेक साजरा केला जात आहे. आजच्या दिवशी शिवराज्याभिषेक झालाच नव्हता. शिवराज्याभिषेक दिनाची तारीख जगामध्ये सगळ्यांना माहित आहे ती 6 जून, 1674 आहे. याचाच अर्थ 350 वा शिवराज्याभिषेक दिन हा 6 जून, 2024 रोजी आहे. मग आज शिवराज्याभिषेक साजरा करण्याचा विचार कोणाच्या सुपीक डोक्यातून बाहेर पडला.

निवडणूकांचे गणित डोळ्यासमोर ठेवून जर असे राजकारण होत असेल तर उभ्या महाराष्ट्राची आज शिवराज्याभिषेक साजरा करणार्‍यांनी माफी मागावी. हा महाराष्ट्राचा अपमान आहे. आणि हिंदू धर्मातील ज्या एका गटाने छत्रपती शिवाजी महाराजांना राज्याभिषेक नाकारला व तुम्ही शूद्र आहात असे म्हटलं. तेच आज तिथे जाऊन सांगत आहेत की, सनातन धर्माचे पालन करा…?असे परखड मत ट्विटरवर जितेंद्र आव्हाडांनी मांडले.
https://twitter.com/Awhadspeaks/status/1664562071374110720

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!