महाराष्ट्रविशेषशहरसामाजिक

काळाखडक प्रकल्पाला स्थगिती संदर्भात चाललेल्या अफवेला कायमचा पूर्णविराम..

काळाखडक झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पाला कोणतेही स्थगिती नसल्याचा निर्वाळा झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, पुणे यांनी दिला.

प्रतिनिधी पिंपरी चिंचवड दि. १३ डिसेंबर २०२४ दोन महिन्या पूर्वी काळाखडक येथील झोपडपट्टी पुनर्वसन योजनेस अपना वतन संघटनेच्या सिद्धिक शेख यांनी सादर केलेल्या तक्रारी अर्जाच्या अनुषंगाने सदर प्रकरणी चौकशी करून पुढील कार्यवाही करणे संदर्भात कार्यालयास कळविले होते.
प्रबंधक, तक्रार निवारण समिती (पुणे शहर), विधान भवन, पुणे यांनी संदर्भाधिन तक्रारी अर्ज चौकशी करून पुढील कार्यवाही करणे करीता या कार्यालयास अग्रेषीत केले होते. या विषयांकित मिळकतीवर विकसक मे. जय एंटरप्रायजेस यांनी या कार्यालयाकडे सादर केलेल्या झोपडपट्टी पुनर्वसन योजनेस दि. ०३/१०/२०२४ रोजी प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आलेली असून कोणत्याही न्यायालयाचे/प्राधिकरणाचे कोणतेही स्थगिती आदेश पारीत करण्यात आलेले नाहीत. असे उपअभियंता झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, पुणे. यांनी दि. १२ डिसेंबर २०२४ च्या पत्राद्वारे कळवले आहे.
या संदर्भात काळाखडक, रहिवासी संघ तर्फे अध्यक्ष,
श्री. जहिर आदम अरब यांनी व त्यांच्या सहकार्‍यांनी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, पुणे. यांचे सोबत पत्रव्यवहार करून व समक्ष भेटून माहिती घेतली.
या निमित्ताने काळाखडक येथील सामाजिक कार्यकर्ते किशोर खंडागळे यांना संपर्क साधला असता ते बोलले की अपना वतन संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सिद्दिक शेख आणि त्यांच्या काही हस्तकानी काही दिवसांपूर्वी काळाखडक पुनर्वसन प्रकल्पाला स्थगिती मिळाली अशी अफवा पसरवलेली होती. मुळात आम्ही यासंदर्भात झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण यांच्या सोबत पत्रव्यवहार केला असता आमच्या असे निदर्शनास आले की या संदर्भात कोणत्याही प्रकारची न्यायालयाने/ प्राधिकरणाने या प्रकल्पास स्थगिती दिलेली नाही. त्यामुळे आमची सर्व झोपडीधारकांना रहिवाशांना विनंती आहे की अशा कोणत्याही भूलथापांना व अफवांना बळी न पडता झोपडपट्टी पुनर्वसनास सहकार्य करावे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!