महाराष्ट्रविशेषशहरसामाजिक
आज कोपरगावात सकल आंबेडकरी समाजाच्या वतीने भव्य जन अक्रोश मोर्चाचे आयोजन…

प्रतिनिधी अजय विघे
कोपरगाव शहरात 12 जून 2023 रोजी सकाळी अकरा वाजता नांदेड येथील अक्षय भालेराव यांच्या हत्येच्या निषेधार्थ कोपरगाव शहरात सकल आंबेडकरी समाजाच्या वतीने मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. हा मोर्चा डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक या ठिकाणाहून निघून तहसील कचेरी तहसीलदार यांना निवेदन देऊन त्यानंतर निषेध सभेचे आयोजन करण्यात आले आहे तेव्हा शहरासह तालुक्यातील भीमसैनिक माता-भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन. कोपरगाव सकल आंबेडकर समाजाच्या वतीने करण्यात येत आहे.



