सत्ताधारी भाजप व आर. एस. एस. चा हिंदुत्ववादी कुटील डाव ओळखा- ॲड. जयदेव गायकवाड

आरक्षण तर सर्व ५९ जाती साठी होते मग मातंग समाजाने ते का संपादन केले नाही ? त्याचा त्यांनी शोध घेतला पाहिजे. ?
प्रतिनिधी पुणे दि. २७ जून २०२६ ॲड. जयदेव गायकवाड यांनी उपवर्गीकरणाच्या निमित्ताने निर्माण झालेल्या मतभेदातून मातंग बौध्द जे एकमेकांवर जी अर्वाच्च भाषा वापरतात त्या बद्दल दुःख व्यक्त केले व अवाहन केले की मातंग समाजाने गंभीरपणे विचार केला पाहिजे ते मागे का पडले ? आरक्षण तर सर्व ५९ जाती साठी होते मग मातंग समाजाने ते का संपादन केले नाही ? त्याचा त्यांनी शोध घेतला पाहिजे आणि क्षिक्षण ही काही वस्तु नाही की ती बंद गोदामात बंद करून ठेवता येते. ती बौध्दांनीच लुटून नेली हे म्हणणे चूकीचे आहे. डॅा.आंबेडकर या महामानवाने शिक्षण हे ज्ञान मिळविण्याचे साधन असून शिक्षण मिळाले तरच माणुस समृध्द होतो म्हणून “शिका !, संघटित व्हा! आणि संघर्ष करा ! “हा मंत्र सर्व समाजाला सांगितला होता. पूर्वाश्रमीचे महार तथा आजच्या बौध्दांनी शिक्षणाचा ध्यास घेऊन ते संपादन केले म्हणून त्यांनीच सर्व आरक्षण पळविले असे म्हणने अज्ञान पणाचे आहे. मातंगांनी डॅा. आंबेडकरांच्या पासून प्रेरणा घेतल्या असत्या तर ते ही पुढे गेले असते. पण त्यांनी बाबासाहेबा कडून शिक्षणाच्या प्रेरणा घेतल्या नाहीत. आज ते हिंदुत्ववाद्यांच्या रणनितीला बळी पडतात. त्यानी हिंदुत्व वाद्यांचे डाव ओळखले पाहिजेत. ते आंबेडकरवाद्यावर करीत असलेले आरोप अज्ञानापोटी करीत आहेत म्हणून आंबेडकरवाद्यांनी त्यांना समजून सांगितले पाहिजे व लढावू मातंगांनाही समतेच्या लढ्यात बरोबर घेतले पाहिजे असे अवाहन केले.
नवबौद्ध – मातंग समन्वयाच्या दिशेने…..
आज संपूर्ण महाराष्ट्रात अनुसूचित जाती अंतर्गत राखीव जागेच्या उप वर्गीकरणाचा प्रश्न चर्चिला जात असताना दोन्ही लढाऊ जातीच्या काही कर्मठ लोकांमुळे दोन जाती मधील तेढ निर्माण झाली आहे. समर्थन आणि विरोध ही आपआपल्या सोयीने भूमिका घेतली जाते तसेच भाजपा आर. एस. एस. यांच्या विखारी प्रचाराचे बळी ठरत आहेत, या पार्श्वभूमीवर दोन्ही लढाऊ व संघर्षशील जाती मधील समंजस लोकांनी समन्वयक भूमिका घेतली पाहिजे. या उद्देशाने पुण्यातील फुले शाहू आंबेडकर यांच्या क्रांतिकारक विचारांवर आधारित काम करणार्या कार्यकर्त्यांनी गुरुवार दिनांक २५ जून रोजी पुण्यातील बाळासाहेब ठाकरे कला दालन येथे नवबौद्ध व मातंग समाजातील लोकांची सलोखा परिषद आयोजित केली होती. यावेळी आपल्या भाषणात माजी आमदार व आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते जयदेव गायकवाड यांनी वरील विधान केले, ते पुढे म्हणाले की धर्मांध जातीवादी शक्तीचा अजेंडा असतो की समाजातील लढाऊ व संघर्षशील समूहाची भांडणे लावायची व त्यांचे ऐक्य होऊ द्यायचे नाही, आज आपण बघतो की भाजप व आर आर एस यांनी लावलेल्या भांडणात आपण एकमेकांच्या विरोधात शत्रू सारखे उभे आहोत, हे अत्यंत चुकीचे आहे.
या परिषदेला आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते वसंत साळवे, जेष्ठ नेते रोहिदास गायकवाड, आंबेडकरी अभ्यासक कार्यकर्ती धम्मसंगिनी रमागोरख, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) नेते शैलेंद्र चव्हाण तसेच विचारवंत व कवी तसेच पूर्णवेळ कार्यकर्ते कॉ. महादेव खुडे, सुजित यादव, सुदीप गायकवाड तसेच मातंग समाजातील कार्यकर्ते अनिल हतागळे, यांनी मौलिक व महत्वाचे मार्गदर्शन केले, या परिषदेचे अध्यक्ष जेष्ठ नेते अंकल सोनवणे होते. या महत्वपूर्ण परिषदेत खालीलप्रमाणे ठराव मंजूर करण्यात आले.
१) बदर समितीचा अहवाल प्रसिद्ध करण्यात यावा.
२) उप वर्गीकरण समितीमधे सर्व अनुसूचित जातीच्या प्रतिनिधी, अभ्यासक, संशोधक, कार्यकर्ते यांचा समावेश करण्यात यावा.
३) सर्वप्रथम जातीय जनगणना करावी व त्यानंतर लोकसंख्येच्या प्रमाणात वर्गीकरण करावे.
४) कोणत्याही अनुसूचित जातीच्या व्यक्तीने बौद्ध धर्म स्विकारल्यास त्यांना नवबौद्ध गटात समाविष्ट करून घेण्याची मुभा असावी.
५)अश्या प्रकारच्या सलोखा परिषदा प्रत्येक शहरात घेण्यात याव्यात.
६) नवबौद्ध व मातंग या लढाऊ, संघर्षशील जातींच्या समन्वय मांडणाऱ्या भूमिकेसाठी महाराष्ट्रभर लॉन्ग मार्च काढण्यात यावे.
७)सलोखा परिषद ही फुले शाहू आंबेडकर व अण्णाभाऊ यांच्या क्रांतिकारक विचारावर आधारित असून कोणी व्यक्ती गट अथवा संघटना फुले शाहू आंबेडकर अण्णाभाऊ या महापुरुषां बद्दल बदनामी करत असेल व त्यातून समाजात द्वेषाचे वातावरण निर्माण करत असेल त्याचा आम्ही निषेध करतो.
ही परिषद समाजात ऐक्याची भूमिका घेऊन जाण्यासाठी अत्यंत महत्वाची भूमिका बजावणार आहे.
ही परिषद सत्यशोधक बहुजन आघाडीचे अध्यक्ष सचिन बगाडे, वंचित बहुजन आघाडीचे नेते नागेश भोसले, सुदर्शन चखाले, नागेश गायकवाड, ॲड. कपिल शिवशरण, राहुल सोनवणे, अरविंद पाटोळे, ॲड. आकाश साबळे या सर्वानी मिळून घेऊन समाजात एकीचा संदेश दिला आहे.



