शिवराज्यभिषेक सोहळ्याला नाशिकहून हजारो शिवभक्तांसह ३५१ गाड्यांचा ताफा रायगडावर राहणार उपस्थित..
प्रतिनिधी रेणूका गायकवाड महाले नाशिक, दि. ०२ जून २०२४ दुर्गराज रायगडवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३५० व्या शिवराज्याभिषेक सोहळ्याची जोरदार तयारी सुरू आहे. दि.६ जून २०२४ रोजी तारखेप्रमाणे शिवराज्याभिषेक सोहळा संपन्न होणार आहे.
रायगडावर डोळ्यांचे पारणे फेडणारा तो सोहळा म्हणजे शिवराज्याभिषेक सोहळा होय. प्रत्येक वर्षीप्रमाणे यावर्षी देखील नाशिकहून शिवराज्याभिषेक सोहळा मोठ्या उत्साहाने साजरा करण्यासाठी हजारो शिवभक्त रायगडावर नतमस्तक होण्यासाठी जाणार आहे. नाशिकच्या शिवभक्तांना होळीचा माळ येथील व्यवस्थापन नियोजन जबाबदारी देण्यात आली असून त्याबाबत नियोजन करण्यासाठी आज नाशिक येथे कालिका देवी मंदिर सभागृहात आढावा बैठक संपन्न झाली.
यात नाशिकचे नियोजन करण्यासाठी शिवप्रेमीची समिती केली असून वाहतूक, पार्कींग, भोजन आदी बाबत माहितीसाठी संपर्क करून सहकार्य व्हावे यासाठी नियोजन करण्यात येणार आहे. यात डॅा.रुपेश नाठे, ज्ञानेश्वर थोरात, उमेश शिंदे, रोशन खैरे, विजय खर्जुल, नितीन पाटील, सागर पवार, ललीत उशीर, समाधान चव्हाण, समाधान मते, समाधान जाधव, वंदना कोल्हे, रेखा जाधव, सुलक्षणा भोसले, रागीनी जाधव आदींना संपर्क करण्याचे आव्हाहन करण्यात आले आहे. यावेळी, विजय चुंभळे, संतोष मिंदे, संदीप अवारे, सुभाष ढोकणे किरण पवार, विकास जाधव, विकास मते आदी उपस्थित होते.
( कोट )
नाशिक जिल्ह्यावरती असलेली होळीचा माळाचा सजावटीची जबाबदरी चांगल्या पद्धतीने पार पाडणार व ३५० वा राज्यभिषेक सोहळा व ३५१ वर्षामध्ये पदर्पण करत असल्यामुळे ३५१ गाड्या नाशीक जिल्हा राज्यभिषेक समीतीचा वतीने ५ जुन रोजी रायगड येथे पोहचतील. असे डॅा.रुपेश नाठे अखील भारतीय शिवराज्यभिषेक महोत्सव समिती यांनी यावेळी सांगीतले.