आठ वर्षानंतर आयोजित महाराष्ट्र कार रॅलीचा अंतिम विजेता कोण बघा अनुवाद आपला न्युज वर..
प्रतिनिधी रेणूका गायकवाड महाले नाशिक दि. ०३ जून २०२४ फायनल बातमी- समवेत फोटो-रॅलीतील विजेत्यांचे शँम्पेन शॉवर करतांना कर्ण कदूर,मुसा शेरीफ,विसाचे अध्यक्ष अश्विन पंडित.
कर्ण कदूर, मुसा शेरीफ जोडीला ओव्हरऑल चॅम्पियनचा किताब आयएनआरसी गटात अहेमर, अर्णवसिंग, जिप्सीत अग्रवाल अजिंक्य.
नाशिक ब्लु बॅड स्पोर्टस् आयएनआरसी २०२४ रॅली ऑफ महाराष्ट्र स्पर्धेत आपल्या अनुभवाच्या जोरावर बंगळूरच्या अर्का मोटारस्पोर्टसच्या मानांकित कर्ण कदूर-मुसा शेरीफ जोडीने ओव्हरऑल चॅम्पियन शिपचा किताब पटकावला. आयएनआरसीच्या इतर गटात फाबीद अहेमर, अर्णव प्रताप सिंग, जिप्सी गटात संजय अग्रवाल तर क्लासिक गटात शेख हुसेन पाशा यांनी जेतेपद पटकावले. उत्सुकतेच्या महिला गटात (जेएनआरसी) निकिता टकले-शिवानी परमार या जोडीने आपले वर्चस्व राखत अजिंक्यपद पटकावले.
ब्लु बॅंड स्पोर्टस् आयएनआरसी २०२४ च्या रॅली ऑफ महाराष्ट्रचा आजचा अखेरचा दिवसही चांगलाच गाजला. रॅलीच्या बोबींलटेक ते मेटकावळे या भागातील २२ किलोमिटरच्या चरणात आजही अर्जुन राव, वेणूनाथ व्ही, रामचंद्रन् सी, युध सम्राट या कारचालकांचे गाडीवर नियंत्रण सुटल्याने गाड्या रस्ता सोडून बाहेर गेल्या. या तिन्ही गाड्यां रस्त्यावर आडव्या झाल्याने इतर कारचालकांना अडचण झाली. पण नंतर ती सुरळीत करण्यात आली. निळमाती, हिवरेपाडा या भागातही काही गाड्यांना तांत्रिक अडचणी आल्याने साडेनऊ किलोमिटरची रॅली अर्धवट सोडून द्यावी लागली. आजही डोंगर, टेकड्यांवर तसेच झाडावर बसून रॅली पाहण्याचा आनंद या भागातील गावकऱ्यांनी आनंद घेतला. टाळ्या, शिट्या वाजवून, व्ही फोर व्हिक्ट्री करत त्यांनी कार चालकांचा उत्साह वाढवला.
पारितोषिक वितरण उत्साहात..
विसाचे अध्यक्ष अश्विन पंडित, ब्लु बॅंडचे प्रेम काशिनाथ, ग्रेप कौंटीचे संचालक तेजस चव्हाण, स्टील इंडियाचे व्यवस्थापक तपन शर्मा, प्रदीप समारीकर आदीच्या हस्ते विविध गटातील विजेत्यांना स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले. रॅलीनंतर शॅम्पेन शॉवर करत विजेत्यांनी आनंदोत्सव साजरा केला. रॅलीसाठी मायएफसह विविध सहप्रायोजकांचे सहकार्य लाभले. श्री.पंडीत यांनी प्रास्ताविक व स्वागत केले. शिल्पा भेंडे यांनी सुत्रसंचालन केले.
स्पर्धा निकाल असा.. (गटविजेते,द्वितीय,तृतीय, वेळ या क्रमाने,)
ओव्हरऑल चॅम्पियन
-कर्ण कदूर- १तास ४७ मि.५२ सेकंद
-अमित्रजित घोष- १ तास४९मि.८ सेकंद
-अर्णव प्रताप सिंग- १तास४९ मि.२९ सेकंद
आयएनआरसी-२
-फाबीद अहेमर- १तास ५१मि.१० से.
-प्रगती गौडा- १तास ५९ मि. ३२ से.
-यशस नायका- १तास ५९ मि.४० से
आयएनआरसी-३
-अर्णव प्रताप सिंग- १ तास,४९ मि.२९ से
-जीत जबाख- १ तास ४९ मि.३५ सेकंद
-दरायश श्रॉफ- १ तास ४९ मि.५३ से
आयएनआरसी महिला गट-(प्रथम,द्वितीय,तृतीय क्रमाने)
-निकीता टकले
-फोरबे नॉनग्रंम-
हर्षिता गौडा
जेआयएनआरसी गट
-अर्णव प्रताप सिंग
-अबिहिन राय
-निकिता टकले
जिप्सी चॅलेंज
-बलजिंदरसिंग धिल्लो-१ तास ५८ मि.१२ से.
-डॉ.आकर्ष सुंदर-१ तास ५८ मि.४७ सें.
-सचिन सिंग-१ तास५७ मि.१९ सेकंद
क्लासिक गट
-शेख हुसेन पाशा-२ तास २७ मि.४० से
-अनिहनाथ एस.-२ तास ४२मि.२२ से.